शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापरिषदेच्या निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण गटाची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 21:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात झालेल्या ३७ जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात झालेल्या ३७ जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. अधिसभा आणि विद्यापरिषदेच्या ३७ पैकी तब्बल २७ जागा आमदार सतीश चव्हाण समर्थक उत्कर्ष पॅनलला मिळाल्या असल्याचा दावा विजयी उमेदवार डॉ. राजेश करपे यांनी केला आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी आक्षेप घेण्यात आलेल्या ५ जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून, निकाल राखीव ठेवल्याचे सांगितले.विद्यापीठाच्या अधिसभेच्या २९ आणि विद्यापरिषदेच्या ८ जागांची मतमोजणी दोन दिवसांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पूर्ण झाली आहे. यात पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलला अधिसभेत २० आणि विद्यापरिषदेच्या ७ जागा जिंकल्या असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. यातील महाविद्यालयीन प्राध्यापक गटातील आरक्षित पाच जागांचे निकाल राखीव ठेवले असले तरी त्या जागांच्या मतमोजणीत सर्व जागांवर उत्कर्ष पॅनलच्या उमेदवरांना तीनशे पेक्षा अधिक मताधिक्य मिळाले असल्याचे डॉ. राजेश करपे यांनी सांगितले. विद्यापीठ विकास मंचचा प्राचार्य गटात चार, प्राध्यापकात दोन आणि विद्यापरिषदेत एक उमेदवार विजयी झाला आहे.कोणतेही कारण नसताना रात्री गोंधळमतमोजणी कक्षात बसविण्यात आलेला टेबल तुटल्यामुळे काही मतपत्रिका बाजुला ठेवल्या होत्या. यात एका केंद्राच्या ८३ मतपत्रिकांचा समावेश होता. आरक्षित प्रवर्गातील जागांमध्ये  दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत असल्यामुळे या मतपत्रिकांचा आकडा जुळवला नाही. त्याकडे दोन्ही गटांच्या उमेदवारांनीही लक्ष वेधले नाही. मात्र खुल्या प्रवर्गातील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एकूण मतपत्रिकांमध्ये ८३ मतपत्रिका कमी भरत असल्याचे लक्षात आले. तेव्हा शोधाशोध केली असता, एका मतपेटीत ८३ मते सापडली. त्यात आरक्षित प्रवर्गातील मतपत्रिकाही होत्या. मात्र आरक्षित प्रवर्गाची मतमोजणी पूर्ण झाली होती. तेव्हाच एका गटाच्या  उमेदवारांनी मतमोजणी थांबवत मतदान पुन्हा घेण्याची मागणी केली. ही मागणीच कायद्याला धरुन नव्हती. यामुळे पोलिस सरंक्षणात आरक्षित प्रवर्गातील मतपत्रिका सिलबंद केल्या असल्याचे डॉ. साधना पांडे यांनी सांगितले. एका दिवसानंतर दोन्ही गटाला बोलावून तोडगा सांगण्यात येईल. मान्य न झाल्यास प्रशासन योग्य तो निर्णय घेत निकाल जाहीर करेल. आमच्याकडे सर्व प्रकारचे सिसिटीव्ही फुटेज उपलब्ध असून, मतपत्रिका बाहेरुन आणून टाकल्या हा आरोप चुकीचा असल्याचेही डॉ. पांडे म्हणाल्या.पुन्हा मतदान घेण्याची मागणीविद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापरिषदेच्या निवडणुकीत प्रचंड गैरप्रकार झाले आहेत. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या दबावात सर्व निर्णय घेत आहेत. मतमोजणीच्या दिवशीही मध्यरात्री विज घालविण्यात आली. त्याचवेळी काही मतपत्रिका पळवून घेऊन जात असताना प्रवेशद्वारावर पकडण्यात आल्याचा आरोप करत अधिसभा व विद्यापरिषदेची फेरनिवडणूक घेण्याची मागणी विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. गजानन सानप यांनी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तत्पूर्वी कुलगुरू, निवडणूक निर्णय अधिका-यांनाही मंचतर्फे निवेदन देण्यात आले. यात निवडणूक निर्णय अधिका-यांनी महाविद्यालयीन प्राध्यापक गटातील  निकाल राखीव ठेवल्याचे पत्रही मंचच्या उमेदवारांना दिले.पराभव झाल्यामुळे बेछूट आरोपविद्यापीठ विकास मंचने राज्य सरकार, केंद्र सरकारमधील असलेल्या सत्तेच्या जोरावर विजयी होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र ते धुळीस मिळाल्यामुळे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर बेछूट आरोप करण्यात येत असल्याचे उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक डॉ. शिवाजी मदन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच उत्कर्ष पॅनलचा दणदणीत विजय झाला असून, आगामी पाच वर्षात विद्यार्थी हिताचे निर्णय घेत विद्यापीठाला गतवैक्षव मिळवून देणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादuniversityविद्यापीठ