महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ औरंगाबाद शहरातील दौऱ्यात विविध कार्यक्रम, सहविचार सभा, तसेच प्रत्यक्ष भेटीचे आयोजन केले होते. पदवीधरांचे प्रश्न आक्रमकतेने विधानपरिषदेत मांडून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले. पदवीधरांसाठी एकदिलाने काम करणारे सक्षम नेतृत्व प्रचंड मताधिक्याने विधानपरिषदेत पाठवा, असे आवाहन मेळाव्यात करण्यात आले.
दरम्यान, चव्हाण यांच्या प्रचारार्थ कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या विशेष उपस्थितीत शनिवारी औरंगाबाद पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सतीश चव्हाण शनिवारी औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन पदवीधर मतदारांशी संवाद साधणार आहेत.