शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

औरंगाबादमध्ये आहे सातवाहनकालीन जाते; एकाच वेळी दोन महिला दळत होत्या दळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 19:36 IST

सर्वांनी उभ्या दांड्याचे जाते पाहिले आहे; पण शहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहे, तेही सातवाहनकालीन, म्हणजे सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचे.

ठळक मुद्देशहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहेया जात्याला आडवी दांडी, एकाच वेळी दोन महिला दळत होत्या दळण

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : पूर्वी घरोघरी महिला जात्यावरच दळण दळत असत; मात्र काळाच्या ओघात जाते मागे पडले. आता फक्त लग्नाच्या विधीपुरतेच जात्याचे महत्त्व मर्यादित राहिले आहे. सर्वांनी उभ्या दांड्याचे जाते पाहिले आहे; पण शहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहे, तेही सातवाहनकालीन, म्हणजे सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचे. ते दगडी जाते एवढे जड आहे की फिरवण्यासाठी दोन महिला लागत.   

‘कोंबड्याची बांग.. आली कानावर बाई... ये गं दळण दळाया, सई बाई गं बाई....सासराच्या जात्यात... जीव अडकतो लई, गरागरा फिरताना.. हात थांबतच न्हाई’, अशा ओव्या म्हणत सासुरवाशिणी पहाटे पायलीपायलीने दळण दळत असत. भक्तीची आस आणि प्रापंचिक दु:खाची न संपणारी वीण यांचे दर्शन पहाटेच्या जात्यावरच्या ओव्यांमधून होत असे. या जात्यांची व ओव्यांची आठवण शहरातील पुराणवस्तू संग्राहक रमेश रुणवाल यांनी त्यांच्याकडील सातवाहनकालीन जाते दाखविल्याने झाली. टिळकपथ रोडवरील आपल्या दुकानातील माळवदावर त्यांनी हा दुर्मिळ, ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला आहे. जाते तर सर्वांना माहीत आहे. मग, या जात्याचे वैशिष्ट्य काय... असे आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल.

आजही अनेकांच्या घरात दगडी जाते आहे; पण त्यास फिरविण्यासाठी एकच दांडा असतो; मात्र रुणवाल यांच्याकडील जात्याला उभा नव्हे आडवा दांडा आहे. एक नव्हे, तर दोन महिला समोरासमोर बसून या जात्यावर दळण दळत असत. इतिहास संशोधकांच्या मते सातवाहन काळात या जात्याची निर्मिती झाली असावी. तेव्हा जात्याला आडवी दांडी असे. रमेश रुणवाल यांनी सांगितले की, पुराणवस्तूच्या शोधासाठी ते देशभर फिरत असतात.

३६ वर्षांपूर्वी नेवासा येथील त्यांचे मित्र मोहिते यांच्या घरी त्यांना हे आडव्या दांडीचे जाते दिसले. मोहित्यांनी ते जाते रुणवाल यांना दिले. हे जाते सातवाहनकालीन असल्याचा निर्वाळा तेव्हाच इतिहास संशोधक ब्रह्मानंद देशपांडे यांनी दिला होता. रुणवाल यांनी हे जाते नंतर आपल्या पोटच्या मुलासारखे सांभाळले आहे; मात्र आता  जात्याच्या दगडाची झीज झाली आहे. खालच्या पाळूला तडेही गेले आहेत. आता हे जाते जतन करणे अवघड होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तुसंग्रहालय किंवा सोनेरी महल येथील पुरातनवस्तुसंग्रहालयात हे प्राचीन जाते देण्याचा त्यांचा विचार आहे.

अशी जाती दुर्मिळच इतिहास संशोधक डॉ.रा.श्री. मोरवंचीकर हे जात्याचे वैशिष्ट्य सांगताना म्हणाले की, ‘सातवाहनकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात मी  सातवाहनकालीन जात्याचा उल्लेख केला आहे. सिंधू संस्कृतीत पाट्यांचा वापर केला जात असे. पाट्यांप्रमाणे सातवाहन घरांत जाती सापडली आहेत. धान्य दळण्यासाठी जात्याचा उपयोग प्रथम याच काळात केला गेला. या जात्याची खालची तळी पातळ व बर्हिगोल असून, वरची तळी उभट गोल आकारात असत. वरच्या तळीस उंचावलेले तोंड असून, या तोंडाच्या गळ्यातून आडवा लाकडी दांडा घालण्याकरिता आरपार छिद्र आहे. वरची तळी खालच्या तळीमध्ये अडकवलेल्या उभ्या लोखंडी खिळ्याभोवती बसविली जाते. दोन महिला परस्परांसमोर बसून आडव्या दांड्याच्या  मदतीने जाते गोलाकार फिरवीत. आजच्या जात्याच्या सुटसुटीतपणापुढे हे जाते थोडेसे अवघड वाटते.

उत्खननात सापडतात...आडवी दांडी असलेले हे जाते सातवाहनकालीन आहे. कोल्हापूर, शिरपूर, नेवासा, भोकरदन या पट्ट्यात उत्खन्नात अशी जाती सापडली आहेत. ५० वर्षांपूर्वी नेवासा भागात डेक्कन कॉलेजने डॉ. साकलिया यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन केले होते. त्यात आडव्या दांडीचे तीन जाते सापडले होते. काही संग्राहालयांत अशी जाती आपणास बघण्यास मिळतील. - साईली पलांडे-दातार, पुरातत्व अभ्यासक 

टॅग्स :cultureसांस्कृतिकArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण