शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

सातारा न.प. आक्षेपांवर २७ जून रोजी सुनावणी

By admin | Updated: June 13, 2014 01:11 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषद स्थापनेची रखडलेली कार्यवाही पुन्हा सुरू झाली आहे.

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषद स्थापनेची रखडलेली कार्यवाही पुन्हा सुरू झाली आहे. नगर परिषद स्थापनेबाबत आलेले आक्षेप आणि सूचनांवर जिल्हा प्रशासनाने २७ जून रोजी सुनावणी ठेवली आहे. सुनावणीनंतर लगेचच राज्य सरकारला अहवाल सादर होऊन नगरपालिका स्थापनेची अधिसूचना जारी होणार आहे. औरंगाबाद शहरालगत सातारा आणि देवळाई गावांच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने विकास होत आहे. दोन्ही गावांच्या परिसरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत असून, येथील लोकसंख्याही ५० हजारांच्या पुढे गेली आहे. या भागांचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी दोन्ही गावांची मिळून संयुक्त नगर परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने गेल्यावर्षी राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यावर राज्याच्या नगरविकास विभागाने १३ फेबु्रवारी रोजी सातारा- देवळाई नगर परिषदेची उद्घोषणा जारी केली. याद्वारे सरकारने नगर परिषद स्थापनेचा इरादा जाहीर करून स्थानिक नागरिकांकडून याविषयीच्या सूचना आणि आक्षेप मागविले. १५ फेबु्रवारी ते १५ मार्च यादरम्यान जिल्हा प्रशासनाला १५ सूचना आणि आक्षेप प्राप्त झाले. त्यानंतर लगेचच सुनावणी होणे अपेक्षित होते; परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर याविषयी कार्यवाही सुरू झाली. त्यात पुन्हा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही कार्यवाही थांबविण्यात आली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता २४ जून रोजी संपणार आहे. २७ जून रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुनावणी झाल्यावर दोन-तीन दिवसांत अहवाल सरकारला सादर केला जाईल. हा अहवाल सादर झाल्यानंतर सरकारकडून अधिसूचना जारी होऊन सातारा- देवळाई संयुक्त नगरपालिका अस्तित्वात येणार आहे. १५ पैकी ३ आक्षेप मागेनगरपालिका स्थापनेसंदर्भात स्थानिक नागरिकांकडून १५ आक्षेप दाखल झाले होते. मात्र, त्यातील ३ आक्षेप नंतर मागे घेण्यात आले. आता १२ आक्षेप आहेत. त्यातील बहुतांश आक्षेप सूचना करणारे आहेत.सातारा आणि देवळाईलगतचे आणखी काही गट नवीन नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करावेत, अशी मागणी त्यात करण्यात आलेली आहे. या सर्व सूचना आणि आक्षेपांवर सुनावणी होणार आहे. कशी असेल नवीन नगर परिषदगावेलोकसंख्याक्षेत्रफळमालमत्तासातारा३९,९६०२,७९३ हेक्टर१८,३४८देवळाई १०,६१०४६४ हेक्टर७,६१५एकूण५०,५७०३,२५८ हेक्टर२५,९६३