शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-देवळाईकरांना आता होतोय पश्चात्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:08 IST

सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनगर परिषदच हवी होती : पाणी, रस्ते, दिवे, ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांचा अभाव; मालमत्तांना दर येईना

साहेबराव हिवराळे।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. सुविधांच्या अभावामुळे मालमत्तांचे दरही खाली आले आहेत.सातारा-देवळाई ग्रामपंचायती नगर परिषदेत विलीन झाल्या. वॉर्ड रचना, आरक्षणदेखील घोषित झाले. विकासकामासाठी १०० कोटींचा निधी येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच नवीन नोटिफिकेशन जाहीर झाले अन् शहरालगतचे क्षेत्र असल्याने ते महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली.सातारा-देवळाईतील नागरिकांनी शासनदरबारी व न्यायालयातही लढाई लडविली. मात्र, सातारा-देवळाई परिसराचा समावेश महापालिकेत झाला. दोन्ही वॉर्डांतून लोकप्रतिनिधी निवडून दिले. मात्र, परिसरातून मालमत्ता कर वसुलीशिवाय इतर सेवा-सुविधा देण्यावर मनपाचे लक्ष नाही.तीन वर्षांचा कालावधी उलटूनही आमदार निधीशिवाय मनपाने विकासकामावर खर्च केला नाही. त्यामुळे टोलेजंग इमारतीकडे पाहत नागरिकांना चिखलातून वाट काढीत घर गाठावे लागतेय. रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज या मूलभूत सेवेसाठी सतत संघर्षाची भूमिका नागरिकांना पार पाडावी लागते. सेप्टिक टँकचे सांडपाणी रस्त्यावर, मोकळ्या प्लॉटवर तुंबल्याने रोगराईची भीती सतत आहे.वीजपुरवठा सतत खंडितशहरात असूनदेखील दररोज खेड्यातील लोडशेडिंगसारखे सातारा-देवळाईकरांंना वीज गुल होण्याचा अनुभव येतो. संपर्क करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. उन्हाळ्यात उकाडा व डासांच्या त्रासात रात्र घालवावी लागते, अशी खंत जितेंद्र जैस्वाल यांनी व्यक्त केली.खेड्यांतील रस्ते गुळगुळीत झाले आहेत; परंतु सातारा-देवळाईकरांना देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची प्रतीक्षा आहे. विकासकामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रदीप जाधव यांनी केली.आंदोलनाच्या पवित्र्यातसेवा-सुविधा पुरवाव्यात, अन्यथा सातारा-देवळाई संघर्ष समिती नगर परिषदेच्या मागणीसाठी आंदोलन उभारेल, असा इशारा पद्मसिंह राजपूत, राहुल सिरसाठ, सोमीनाथ शिराणे, इम्रान पटेल, आबासाहेब देशमुख, रामेश्वर पेंढारे, रणजित ढेपे, शिवाजी हिवाळे, रमेश बाहुले, नीलेश चाबूकस्वार यांनी दिला आहे.मनपापेक्षा नगर परिषद बरीयेथे ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषदेकडून दरवर्षी टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात होता. नगर परिषदेनेदेखील केला; परंतु मनपा मोफत टँकर देत नाही, पैसे भरूनही ते पाठवीत नाही. नाईलाजाने खाजगी टँकरवर तहान भागवावी लागते. मनपापेक्षा नगर परिषद बरी म्हणण्याची वेळ आली आहे, असे एकनाथ काळे म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीelectricityवीज