शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मायबाप सरकार, ५० रुपयांत घरी कसे जाणार? जनआरोग्य योजनेत प्रवासासाठी तुटपुंजी रक्कम

By संतोष हिरेमठ | Updated: September 25, 2023 18:38 IST

रुग्णालयातून सुटी होताना रुग्णाच्या हातात ५० रुपये देऊन फोटो काढून घेतला जातो

छत्रपती संभाजीनगर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर प्रवासापोटी रक्कम दिली जाते. ही रक्कम वाचून तुम्ही थक्क व्हाल. जिल्ह्यातील रुग्णांसाठी ही रक्कम आहे ५० रुपये आणि जिल्ह्याबाहेरील रुग्णांसाठी १०० रुपये आहे. इतक्या रकमेत फक्त रुग्णालयातून बसस्थानक आणि रेल्वे स्थानकच गाठता येते. पुढचा प्रवास कसा करणार, असा प्रश्न रुग्णांना भेडसावतो.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे जिल्ह्यासह राज्यभरातील ३६ जिल्ह्यांतील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना उपचार घेणे सोयीचे झाले आहे. या योजनेमुळे उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याची वेळ टळते. या योजनेत पूर्वी १.५० लाखांपर्यंत विमा संरक्षण होते. आता या योजनेत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सगळ्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य रुग्ण दिलासा व्यक्त करत आहेत. परंतु, उपचारानंतर सुटी होताना प्रवासापोटी दिली जाणारी रक्कम पाहून रुग्णांना काहीसा धक्काच बसतो.

किती जणांना प्रवासासाठी दिली रक्कम?या योजनेत प्रवासासाठी ५० ते १०० रुपये देण्यात येतात. जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट (आतापर्यंत) १४ हजार ४०७ लाभार्थ्यांनी या योजनेत मोफत उपचारांचा लाभ घेतला. यासाठी ७४ कोटी ८० लाख ४२ हजार ६०५ रुपयांचे उपचार मंजूर करण्यात आले.

घाटीतून मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानकाचे भाडे किती?घाटी रुग्णालयातून मध्यवर्ती बसस्थानकाला जाण्यासाठी ५० रुपये आणि रेल्वे स्थानकाचे भाडे १०० रुपये सांगण्यात आले. घाटीत मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतून रुग्ण येतात.

पैठण, खुलताबादचे एसटी भाडे किती?मध्यवर्ती बसस्थानकातून पैठणसाठी ८० रुपये आणि खुलताबादसाठी ४५ रुपये भाडे आहे.

रेल्वेचे भाडे किती?जनरल तिकीट घेतले तर जालन्यासाठी एक्स्प्रेस रेल्वेचे ४० रुपये, सुपरफास्ट रेल्वेचे ५५ रुपये भाडे आहे. परभणीसाठी एक्स्प्रेसचे ७५ रुपये आणि सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ९० रुपये भाडे आहे, तर नांदेडसाठी एक्स्प्रेसचे भाडे ९० रुपये आणि सुपरफास्ट एक्स्प्रेसचे भाडे १०५ रुपये आहे.

काय म्हणाले अधिकारी?महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, योजनेत एसटी आणि रेल्वेच्या जनरल तिकिटानुसार रक्कम देण्याचे नमूद आहे. त्यानुसार ५० रुपये आणि १०० रुपये दिले जातात.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय