औरंगाबाद : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अखेर सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांची नियुक्ती झाली असून, शहर जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आ. नामदेव पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.मावळते जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांची प्रदेश काँग्रेस कमिटीवर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, आमदार सुभाष झांबड आणि अरुण मुगदिया यांची हे प्रदेश महासचिव म्हणून काम करतील. प्रदेश सचिवपदावर ज्येष्ठ कार्यकर्ते समशेरसिंग सोधी यांना संधी देण्यात आली आहे. आॅल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सहमतीने ही सर्व नावे जाहीर केली आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि शहर जिल्हाध्यक्ष बदलण्यासंदर्भात (पान २ वर)
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सत्तार; शहराध्यक्षपदी पवार
By admin | Updated: April 13, 2016 00:52 IST