लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील बेलोरा येथील विवाहाच्या एक महिन्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीसह आरोपीला भोकरदन पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतले़बेलोरा येथील आप्पासाहेब शिंंदे यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्यांच्या विवाहित मुलीला किशोर श्रीरंग महाले याने २८ मार्च रोजी लग्नाचे आमिष दाखऊन पळवून नेले आहे. त्या अनुषंगाने भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.मात्र गेल्या तीन महिन्यांपासून सदर जोडपे पोलिसांना सापडत नव्हते. ३१ मे रोजी सदर जोडपे औरंगाबाद येथील वाळुज परिसरातील जोगमाई मंदिर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर वसावे, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक वैशाली पवार, रूस्तुम जैवळ, विजय जाधव यांनी दोघांना भोकरदन पोलिस ठाण्यात आणले. सदर मुलीला आई वडीलाच्या ताब्यात देण्यात आले.
बेलोरातील सैराट जोडपे पोलिसांच्या ताब्यात
By admin | Updated: June 1, 2017 00:34 IST