शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

सरस्वती भुवन महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र नसताना प्राध्यापकपदी निवड

By राम शिनगारे | Updated: October 7, 2023 13:45 IST

निवड रद्द करण्याची आदिवासी संशोधक, हक्क समितीची मागणी

छत्रपती संभाजीनगर : सरस्वती भुवन महाविद्यालयात अनुसूचित जमातीच्या जागेवर जात प्रमाणपत्राची वैधता नसलेल्या उमेदवारांची निवड केली आहे. ही निवड रद्द करीत वैधता प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांची निवड करावी, अशी मागणी आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समिती, ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबल्स आणि विद्यापीठ अधिसभा सदस्यांनी संस्थेसह कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्राणिशास्त्र विषयासाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. संबंधित उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याचा दावा आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समिती, ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबल्स संघटनेने केला आहे. मराठवाडा विभागात कोळी जातीचे लोक कोळी महादेव किंवा मल्हार कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र खोटे पुरावे तयार करून मिळवत असल्याचे शासनाने स्थापन केलेल्या विभागीय चौकशीत निदर्शनास आले आहे. तसेच औरंगाबाद खंडपीठानेही याविषयी अलीकडेच निरीक्षण नोंदवले आहे. तसेच काही याचिकांमध्ये अशा पद्धतीच्या प्रमाणपत्रांमुळे जात वैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय संबंधित उमेदवाराची अनुसूचित जमातीच्या जागेवर निवड करण्यात येऊ नये, असे आदेशच शासनाने दिलेले आहेत. त्या आदेशाचे स. भु. ने उल्लंघन केले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. दोन्ही संघटनांच्या निवेदनावर अनिस तडवी, शिल्पा धनवे, साधू पावरा, आकाश ढोले, गजानन डुकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अधिसभा सदस्याचे कुलगुरूंना निवेदनविद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. चंद्रकांत कोकाटे यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना निवेदन देत विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जमातीच्या जागांवर निवड करताना संबंधितांचे जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करावे, अशी मागणी केली आहे. स. भु. संस्थेत एसटीच्या जागेवर निवडलेल्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याचे उघडकीस आल्याचेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. त्या निवडीला मान्यताही देण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र