शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संजय शिरसाटांची मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी; शक्तिप्रदर्शनासाठी हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 12:40 IST

बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार संजय शिरसाट यांनी देखील मंत्रीपदासाठीच्या मोर्चेबांधणीत आता उडी घेतली आहे.

औरंगाबाद: शिवसेनेत झालेल्या बंडानंतर स्थापन झालेल्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास अद्याप मुहूर्त लागलेला नाहीत. लवकरच शपथविधी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदारांनी मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार संजय शिरसाट यांनी देखील मंत्रीपदासाठीच्या मोर्चेबांधणीत आता उडी घेतली आहे. शक्तिप्रदर्शनासाठी त्यांच्या औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील हजारो कार्यकर्ते आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

शपथविधीच्या १५ दिवसानंतर देखील सध्या राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे दोघेच सांभाळत आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे. शिंदे गट आणि भाजपात मंत्रीपदाची विभागणी अद्याप जाहीर झाली नाही मात्र त्यापूर्वीच आपल्याला मंत्रीपद मिळावे यासाठी आमदारांकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून दूर केलेले संतोष बांगर यांनी देखील असेच शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.  दरम्यान, आज औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिवसेना नगरसेवक, तालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, सरपंच, शाखाप्रमुख, महिला आघाडी तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी हे मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबई येथे आज सकाळी १० वाजता रवाना झाले आहे.

यात विजया शिरसाट, नगरसेवक सिंध्दात शिरसाट, हर्षदा शिरसाट, तुषार शिरसाट, माजी जिल्हाप्रमुख मचिंद्र सोनवणे, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, राजू राजपूत, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आदीकराव पाटील, विभागप्रमुख हरिभाऊ हिवाळे, सुरेश बाहुले, शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, मनोज सोनवणे, ईश्वर पारखे, शिवाजी हिवाळे, सुनील काळे, राम पाटोळे, युवासेना ज्योतिराम पाटील, सूरज शिंदे, अमोल पाटे, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, सरपंच सचिन गरड, संदीप आरके, गणेश जाधव, मंगेश जाधव, श्रीकांत साळे, अनिल बिरारे, विजय पैठणे, राजन गरबडे, निलेश नरवडे, विशाल खंडागळे, अमर सभादिंडे, गुडू बसणीवाल आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटAurangabadऔरंगाबाद