परतूर : दुधना नदीच्या डोल्हारा वाळू पट्टयातून रात्री अनधिकृत वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर गावकऱ्यांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.परतूर तालूक्यातील गोदावरी व दुधना नदीच्या पात्रातून मोठया प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. पोलिस व महसूल अधूनमधून कारवाया करून ही वाहने ताब्यात घेते. परंतु ही वाहने सुटली की, पुन्हा वाळू पात्रात वाळू उपशासाठी लगेच सज्ज असतात. यामुळे पोलिस व महसूल यांच्यातही कारवाया करण्यावरून खटके उडत आहेत. पोलिस, महसूल बरोबरच आता या वाळूमाफियांच्या विरोधात वाळू पट्ट्यातील गावकरीही उतरले आहेत. दि. २६ रोजी रात्री डोल्हारा वाळू पट्ट्यातून विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्राली (जी. जे. २ एक्स ९०७७) हे विना परवाना वाळू उपसा करत होते. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी हा ट्रॅक्टर पकडून पोलिंसाना कळवले. पोलिस घटना स्थळी येऊन हा ट्रक ताब्यात घेतला. यावेळी वाळू भरणारे व चालक पळून गेले. पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
गावक ऱ्यांनीच पकडले वाळूचे ट्रॅक्टर
By admin | Updated: March 28, 2016 00:07 IST