शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गाळ उपशाच्या नावाखाली ‘गिरिजा’तून वाळू तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:58 IST

तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात सध्या गाळ उपसा सुरू असून गाळ उपशाच्या नावाखाली सर्रास वाळूचा उपसा करण्यात येत असून दररोज शेकडो ट्रॅक्टर व टिप्परने वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. याबाबत पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे ‘दुर्लक्ष’ होत असल्याने वाळूचा हा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू आहे.

सुनील घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात सध्या गाळ उपसा सुरू असून गाळ उपशाच्या नावाखाली सर्रास वाळूचा उपसा करण्यात येत असून दररोज शेकडो ट्रॅक्टर व टिप्परने वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. याबाबत पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे ‘दुर्लक्ष’ होत असल्याने वाळूचा हा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू आहे.तालुक्यातील सर्वात मोठा गिरिजा मध्यम प्रकल्प असून हा प्रकल्प कोरडाठाक पडल्याने पाटबंधारे सिंचन विभागाने या प्रकल्पातून शेतकऱ्यांना गाळ पेरा नेण्याचे आवाहन केले. परंतु परिसरातील काही वाळू तस्करांनी महसूल व पोलीस प्रशासनास हाताशी धरून गाळ ऐवजी सर्रास दिवसरात्र वाळू उपसा करण्याचे काम सुरु केले आहे. या प्रकल्पातून गाळ कमी आणि वाळूच जास्त उपसा करीत असल्याचे चित्र दिसत आहे. रात्री तर वाळूचा गोरखधंदा मोठा तेजीत सुरू असतो. तालुका प्रशासनास वाळू तस्करांनी हाताशी धरून गिरिजा प्रकल्पाचे लचके तोडण्याचे काम हाती घेतले आहे. आमच्या प्रतिनिधीने शुक्रवारी दुपारी बारा वाजता गिरिजा मध्यम प्रकल्पात फेरफटका मारला असता प्रकल्पातील पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग हाऊसजवळील एका विहिरीवर दोन ट्रॅक्टर वाळूचे भरलेले होते व त्यातील वाळू पाण्याने धुतली जात होती. तसेच प्रकल्पात एका बाजूस सर्रास वाळूचा उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरली जात होती. तर दुसºया बाजूने मशिनरीने गाळ उपसा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरला जात होता. या गैरकामाचे फोटो काढताच ही प्रक्रिया लागलीच थांबली.४या गोरखधंद्याबद्दल पोलीस पाटलांनी उपविभागीय पोलीस अधिकाºयांना लेखी माहिती दिली. गावातीलच वाळू तस्कर असल्याने ग्रामस्थही काही बोलत नाही. मात्र गिरिजा प्रकल्पातील वाळूचा उपसा करून या प्रकल्पाची चाळणी करण्याचे काम काही लोक करीत आहेत. त्याचबरोबर कुठलीही परवानगी नसताना सर्रास वाळूचा उपसा करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करून वाळूचा हा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. मात्र पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल व पोलीस प्रशासन कुठलीच कारवाई करीत नसल्याबद्दल तालुक्यात याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नूतन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई