शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शासन बदलले म्हणून ‘मंजूर कामे’ रद्द नाहीत; विकासकामांबाबत खंडपीठाचे ‘जैसे थे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 15:13 IST

खंडपीठाने प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला असून, या याचिकेवर ७ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी आहे.

छत्रपती संभाजीनगर :  केवळ शासन बदलले म्हणून पूर्वीच्या शासनाने दिलेली ‘वर्क ऑर्डर’ आणि ‘मंजूर कामे’ रद्द करता येणार नाहीत, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेली फुलंब्री तालुक्यातील गिरिजा नदीवरील संरक्षक भिंत बांधण्याच्या कामासह इतर विकासकामे रद्द  केल्यासंदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगाने ‘जैसे थे’चा आदेश दिला.

खंडपीठाने प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला असून, या याचिकेवर ७ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने २८ जून २०२२ रोजी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत फुलंब्री शहरातील राम मंदिर, सांस्कृतिक सभागृह व प्रसाधनगृहाचे बांधकाम यांना मंजुरी दिली होती.

विद्यमान शासनाने कामे केली रद्द पिंपळगाव वळण येथील कामे वगळता इतर चार कामांचे कार्यारंभ आदेश मे. एव्हिएशन कन्स्ट्रक्शन यांना दिले होते. मात्र, फुलंब्रीच्या राम मंदिर ट्रस्ट सांस्कृतिक सभागृहाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला नाही. उलट  ती कामे आणि पिंपळगाव वळण ग्रामपंचायतचे गिरिजा नदीवरील संरक्षक भिंत बांधकाम काम आणि सभागृहाची कामे विद्यमान सरकारने रद्द केली. कंत्राटदार विष्णू ठोंबरे यांनी सभागृहाचे काम रद्द करण्याच्या निर्णयाला ॲड. रवींद्र व्ही. गोरे यांच्यामार्फत,  तर पिंपळगाव वळण ग्रामपंचायतीच्या सरपंच ताराबाई गायकवाड व उपसरपंच वैशाली  वहाटुळे यांनी गिरिजा नदीवरील संरक्षक भिंत तसेच सभागृह रद्द करण्याच्या आदेशाला ॲड. चैतन्य धारूरकर यांच्यामार्फत आव्हान दिले.

टॅग्स :Courtन्यायालयState Governmentराज्य सरकार