शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेडला हवी शिवसेनेच्या कोट्यातून बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा सीट

By बापू सोळुंके | Updated: August 4, 2023 20:16 IST

शिवसेना आण संभाजी ब्रिगेड युतीच्या वर्षभरात ९ बैठका

छत्रपती संभाजीनगर: गतवर्षी शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिवसेनने गतवर्षी २६ ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली होती. या युतीने वर्षभरात एकापाठोपाठ  ९ संयुक्त बैठका घेतल्या. संभाजी ब्रिगेडला हिंगोली आणि बुलढाणा लोकसभेची जाग हवी आहे. या पार्श्वभूमीवर आता दहावी  बैठक उद्या शनिवारी मुंबईच्या बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात होत आहे. या बैठकीला शिवसेना  आणि  संभाजी ब्रिगेडचे प्रत्येकी ३०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उभी फुट पडली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. या घटनेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा नवीन पक्ष अस्तित्वात आला. या पक्षाने गतवर्षी संभाजी ब्रिगेड या पक्षासोबत युती केली. ही युती झाल्यापासून आजपर्यंत राज्यात सार्वत्रिक निवडणूका झाल्या नाहीत.   पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि राज्य विधानसभेची  निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. उबाठा शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या वर्षभरात ९ बैठका घेतल्या. यातील तीन बैठकांना पक्षप्रमुख ठाकरे स्वत: उपस्थित होते. तर अन्य ६ बैठकां शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती प्राप्त झाली.

शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी संभाजी ब्रिगेडला महाविकास आघाडीत स्थान देण्यात आलेले नाही. महाविकास आघाडीतील जागा वाटपानंतर शिवेसनेला प्राप्त होणाऱ्या एकूण सीटमधून हिंगोली आणि बुलडाणा लोकसभा मतदार संघाच्या सीट हव्या आहेत. ही बाब संभाजी ब्रिगेडने यापूर्वीच्या बैठकामधून शिवसेनेला सांगितल्याची माहिती सुत्राने दिली. दरम्यान संभाजी ब्रिगेडची उबाठासोबत युती असली तरी स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये समन्वय दिसत नाही. परिणामी शिवसेनेच्या आंदोलनात अथवा कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडला बोलावले जात नसल्याचे चित्र नजरेस पडते. दरम्यान, उद्या शनिवारी उबाठा शिवसेना आणि  संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होत आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाAurangabadऔरंगाबादsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडShiv Senaशिवसेना