शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंतीनिमित्त समता महोत्सवास सुरुवात; विद्यार्थी, नागरिकांचा उत्फूर्त सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 16:30 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात सलग १० दिवस साजरी करण्यात येत आहे.

औरंगाबाद : सर्वांना समान न्याय, समता आणि बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात सलग १० दिवस साजरी करण्यात येत आहे. बुधवारी ( दि.६ ) सुरु झालेल्या समता महोत्सव शनिवारी ( दि.१६ ) तारखेपर्यंत विविध उपक्रमाने साजरा होत आहे. आतापर्यंतच्या सर्व उपक्रमांना विद्यार्थी, नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्फूर्त सहभाग मिळत आहे. 

येथील सामाजिक न्यायभवनात बुधवारी ( दि. ०६ ) प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांच्या हस्ते या समता सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी सहाय्यक आयुक्त पी. जी. वावळे यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तर गुरुवारी ( दि. ०७ ) विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धांना शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शुक्रवारी ( दि. ०८ ) स्वाधार शिष्यवृत्ती आणि मिनि ट्रॅक्टर लाभार्थींना प्रातिनिधिक  स्वरूपात वितरण करण्यात आले. तर आज ( दि. ९ ) विविध योजनांच्या जनजागृती संदर्भात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. यात अनेक जेष्ठांनी सहभाग नोंदवला. या सप्ताहांतर्गत उद्या रविवारी ( दि. १० ) समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. 

रक्तदान मेळावा, संविधान जागर- तर सोमवारी ( दि. ११) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी रक्तदान मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी ( दि. १२ ) मार्जिन मनी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी ( दि. १३ ) संविधान जागर हा विशेष कार्यक्रम. 

व्याख्यान,जात पडताळणी प्रमाणपत्र वितरण गुरुवारी ( दि. १४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम. व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील. या सोबतच शुक्रवारी दि. १५  रोजी डॉ. बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तर शनिवारी दि. १६ एप्रिल रोजी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन आयोजक सहाय्यक आयुक्त पी.जी. वावळे यांनी केले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर