शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सलाम त्या मातृत्वाला ! आईच्या किडनीने मृत्युच्या दारातील मुलीला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 16:20 IST

६३ वर्षीय आईच्या धाडशी निर्णयाने ४० वर्षीय विवाहित मुलीला मिळाले जीवनदान

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : आई शेवटी आईच असते, ती आपल्या मुलांना कधीच दुःखी पाहू शकत नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता ६३ वर्षीय आईने आपल्या विवाहित ४० वर्षीय मुलीस किडनी देत जीवनदान दिले आहे. नव वर्षात १ जानेवारीला हे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया औरंगाबादेत झाली. ६३ व्या वर्षी आईने आपल्या मुलीसाठी धाडशी निर्णय घेतल्याची घटना सिल्लोड तालुक्यातून पुढे आली आहे.

सिल्लोड तालुक्यातील पांगरी येथील छाया अशोक झरवाल (४०) या गेल्या ३ वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या दोन्ही किडन्या अचानक निकामी झाल्याने औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात किडनी रोग तज्ज्ञ डॉ. सचिन सोनी यांनी त्यांच्यावर उपचार केले. गेल्या सहा महिन्यांपासून डायलिसिस प्रक्रियेवर छायाबाई जगत होत्या. पण ही प्रक्रिया जास्त काळ रुग्णाला वाचवू शकत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून किडनी प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. छायाबाईच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्याने पुढे काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला होता.छायाबाईसह त्यांच्या कुटुंबावर किडनी दाता आणायचा कुठून असे एक ना अनेक प्रश्न पडत होते. त्यातच छायाबाईची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत असल्याने डॉक्टरांनी तातडीने निर्णय घेण्याचे नातेवाईकांना सांगितले होते.

या घटनेची माहिती छायाबाई यांच्या आई रुखमनबाई माहोर (६३, रा. पांगरी) यांना कळताच, त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपली किडनी मुलीस देण्याचा निर्णय घेतला. आई कधीही आपल्या मुलांना दु:खी बघू शकत नाही. त्यामुळे रुखमनबाई यांनी ना आपल्या वयाचा विचार केला ना परिस्थितीचा, क्षणात मुलास किडनी देण्यासाठी त्या रुग्णालयात हजर झाल्या. शनिवारी (दि.१) औरंगाबादेतील एका खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. अभय महाजन, डॉ. चिंचोळे, डॉ. बरनेला, डॉ. प्रदीप मुरके यांच्या उपस्थितीत झाली. छायाबाईसह त्यांची आई रुखमनबाई या माय, लेकीची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येत आहे.

हेही वाचा - वृद्धापकाळात आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना चपराक, मुलींनीच पार पाडले सर्व अंत्यविधी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFamilyपरिवार