लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खाराकुंआमध्ये ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्खनन करण्यात आले; पण तिथे विहीर नसून तळघर असल्याचे आढळून आले आहे. चुनखडी, शिसे मिसळून तयार करण्यात आलेले हे भक्कम बांधकाम २० ते २२ फूट खोल आहे. विशेष म्हणजे या तळघरात गेल्यावर थंडगार वाटते. या तळघराविषयी स्थानिक नागरिकांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. या तळघराचा वापर नेमका कशासाठी केला जात होता, याचे गूढ रहस्य यामुळे आणखी वाढले आहे. महापालिकेने १९९२ सालच्या विकास आराखड्यामध्ये खाराकुंआ भागात तत्कालीन भू-विकास बँक असलेल्या ९ हजार चौरस मीटर जागेवरील जुन्या इमारतीत (देवडी) क्रीडांगणाचे आरक्षण झाले. ही जागा पालिकेच्या मालकीची असून, तेथे क्रीडांगण करण्यासाठी मार्च २०११ मध्ये जुनी इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यात आले होते.