शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या दुचाकी बँकेने जप्त केलेल्या असल्याची थाप मारून केल्या विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 19:21 IST

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यांतून ५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती.

ठळक मुद्देअट्टल दुचाकी चोराच्या ताब्यातून ५ दुचाकी जप्त एमआयडीसी वाळूज पोलिसांची कामगिरी

वाळूज महानगर : बँकेने जप्त केलेल्या असल्याचे सांगून चोरी केलेल्या दुचाकी ग्राहकांना विक्री करणाऱ्या अट्टल दुचाकी चोर शेखर ऊर्फ अण्णा दांडगे (२८, रा. रेणुकाई पिंपळगाव, ता. भोकरदन, जि. जालना) याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात आले. आरोपी दांडगे याने विविध ठिकाणांवरून चोरी केलेल्या १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

वाळूज एमआयडीसी परिसरातील राजेश सत्यभान कांबळे यांची मोपेड (क्रमांक एम.एच.- २०, डी.एस.- ०७२९) व लक्ष्मण मनोहर यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.- २०, सी.झेड.- ३९८०) या दोन दुचाकी दोन वर्षांपूर्वी अज्ञात चोरट्याने बजाजनगर परिसरातून लांबविल्या होत्या. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सिल्लोड तालुक्यातून पारध पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दांडगे याला अटक केली होती. यावेळी आरोपींच्या ताब्यातून वाळूज एमआयडीसीतील लक्ष्मण मनोहर याची दुचाकी (क्रमांक एम.एच.- २० सी.झेड.- ३९८०) जप्त केली होती. दांडगेकडे सापडलेली दुचाकी वाळूज एमआयडीसी परिसरातील असल्याने एमआयडीसी वाळूज पोलिसांनी न्यायालयात हस्तांतरण वाॅरंट घेऊन शेखर दांडगे यास ७ एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते.

थाप मारून विक्रीपोलिसांच्या चौकशीत दांडगेेने औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यांतून ५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती. विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या दुचाकी आरोपी दांडगे हा आपल्या मूळ गावी घेऊन जात होता. बँकेने जप्त केलेली वाहने असल्याचे सांगत त्या विक्री करत होता. दांडगेने विक्री केलेल्या ५ दुचाकी खरेदीदाराकडून जप्त करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गौतम वावळे, सहायक फौजदार कय्युम पठाण, पोना. प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, पोकॉ. नवाब शेख, धीरज काबिले, विनोद परदेशी, मनमोहन कोलिमी, रेवनाथ गवळे, दीपक मतलबे, विक्रम वाघ यांनी बजावली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी