शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी खोटी माहिती देणाऱ्या २६ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:14 IST

ऑनलाईन पोर्टलवर खोटी माहिती भरल्याचे झाले उघड

ठळक मुद्देखोटी माहिती दर्शविलेल्या ७६ शिक्षकांची सुनावणी घेतली.जवळपास २० शिक्षकांच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले नाही.

औरंगाबाद : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी म्हणून आॅनलाईन पोर्टलवर खोटी माहिती भरणाऱ्या जिल्ह्यातील २६ प्राथमिक शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. 

गेल्या वर्षी जिल्ह्यातील सुमारे तीन- साडेतीन हजार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या प्रक्रियेमध्ये आपली सोयीच्या शाळेवर बदली व्हावी, यासाठी काही शिक्षकांनी खोटी माहिती भरली होती. दरम्यान, खोटी माहिती भेटलेल्या काही शिक्षक व संघटनांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांच्याकडे अशा ७६ शिक्षकांची तक्रार केली. सदरील तक्रारींच्या तथ्य शोधनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कौर यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने खोटी माहिती दर्शविलेल्या ७६ शिक्षकांची सुनावणी घेतली. त्यात ५६ शिक्षक दोषी आढळून आले. उर्वरित शिक्षकांच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. दोषी आढळून आलेल्या ५६ पैकी २६ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात आली. 

उर्वरित १८ ते २० शिक्षकांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी ते वैद्यकीय मंडळाकडे सादर केले; पण मंडळाने अभिप्राय देण्यास नकार दिला. त्यानंतर काही शिक्षकांनी पती- पत्नी एकत्रीकरणाच्या नावाखाली काहींनी कंत्राटी तत्त्वावरील आपल्या जोडीदाराची सेवा दर्शविली, काहींनी सहकारी बँकेतील जोडीदाराची, तर काहींनी कंपन्यांमध्ये कार्यरत जोडीदाराची सेवा दाखविली होती. अशा कर्मचाऱ्यांची सेवा ग्राह्य धरावी का, याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते; परंतु त्याबाबत अद्यापही शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. त्यामुळे सध्या तरी २६ जणांविरुद्धच कारवाई करण्यात आली असून, आगामी बदल्यांच्या वेळी सदरील शिक्षकांची रँडम राऊंडद्वारे बदली केली जाणार आहे.

तरीही ३० जणांना मिळाले अभयशिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल म्हणाले, सोयीच्या शाळांमध्ये बदली व्हावी म्हणून शिक्षकांनी खोटी माहिती सादर केल्याच्या अनेक तक्रारी शिक्षकांच्या नावानिशी प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात समितीने सुनावणी घेतली तेव्हा जवळपास २० शिक्षकांच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले नाही. दोषी ५६ पैकी २६ जणांविरुद्ध वेतनवाढ बंद करण्याची कारवाई करण्यात आली, तर ३० शिक्षकांपैकी काही जणांच्या प्रमाणपत्रांवर वैद्यकीय मंडळाने अभिप्राय देण्यास नकार दिला, तर काही जणांबाबत शासनाकडून मार्गदर्शन मिळाले नाही. या शिक्षकांबाबत सीईओ निर्णय घेतील. ही फाईल त्यांच्यासमोरच आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदTransferबदली