शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

साकेतनगरला खड्डे, चिखलाने अवकळा; वाहनांचे नुकसान, रस्त्यावरून चालणे कठीण

By साहेबराव हिवराळे | Updated: October 6, 2023 19:00 IST

एक दिवस एक वसाहत; वाहनांसाठी गल्ली बनली धोकादायक

छत्रपती संभाजीनगर : भावसिंगपुरा परिसरातील साकेतनगर (पेठेनगर) ही वसाहत तशी उच्चभ्रू म्हणून ओळखली जाते. येथील उच्चशिक्षित व उच्चपदस्थ नागरिक मनपाचा कर सातत्याने अदा करतात. परंतु महानगरपालिकेने येथील मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने कानाडोळा केला. त्यामुळे चिखल व खड्डे चुकविताना होणारी घसरगुंडी सहन करीतच नागरिकांना घर गाठावे लागते. कधी मोठ्या अपघातास निमंत्रण दिले जाईल, हे सांगता येत नाही, अशी भीती येथील रहिवासी व्यक्त करतात. जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेले खड्डे महिनोनमहिने न बुजविल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. याकडे स्मार्ट मनपाचे लक्ष जाण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

शहर बसला वावडे...नोकरी तसेच शिक्षणासाठी शहरात ये-जा करणाऱ्यांना खासगी वाहनांशिवाय पेठेनगर, भीमनगर, भावसिंगपुरा व इतर वसाहतीत जाणे शक्य नाही. शहर बसला या परिसराचे वावडे आहे. औरंगपुरा व इतर भागांतून शहर बस सुरू कराव्यात.- यशवंत कांबळे (प्रतिक्रिया)

एकच जलकुंभ, दुसरा कधी?परिसरासाठी दोन जलकुुंभ मंजूर असताना एकाच जलकुंभाचे काम सुरू आहे. ठेकेदाराने खोदलेले रस्ते व्यवस्थित बुजविलेले नाहीत. त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. वाहनांचे नुकसान होत आहे. रस्त्यावरून चालणे कठीण आहे.- माजी नगरसेवक कृष्णा बनकर

डीपी रोड होणार कधी?पडेगाव ते हर्सूल डीपी रोड तयार झाल्यास विविध वसाहतींना अगदी सोयीचे होईल; परंतु त्या रस्त्याचे काम रखडलेले असल्याने छावणीपासून नंदनवन कॉलनीतून एकमेव रस्त्यावरूनच पेठेनगर गाठावे लागते.

उद्यान विकसित करावेपरिसरात उद्यानासाठी सोडण्यात आलेल्या मोकळ्या जागेवर उद्यान विकसित करण्याची आवश्यकता आहे. संरक्षण कुंपण मारून बाग विकसित करावी. त्यामुळे परिसराची शान वाढेल व अतिक्रमणही होणार नाही.- सुभाष साबळे

नळाला कमी दाबाने पाणीजलवाहिनीचे पाणी वाया जात असल्याने नळाला कमी दाबाने पाणी येते. त्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी तुटलेले नळ कनेक्शन जोडणी करून देण्याची गरज आहे.- धनराज गोंडाणे

मनपाचे दुर्लक्षमागासवर्गीयांची उच्चभ्रू वसाहत असलेले साकेतनगरात (पेठेनगर) मोठ्या संख्येने शिक्षक, प्राध्यापक, अभियंते, डॉक्टरांसह प्रशासनातील उच्चपदस्थ या वसाहतीत राहतात. आदर्शांचा भरणा असलेल्या वसाहतीकडे योग्य नेतृत्वाअभावी मनपा मात्र दुर्लक्ष करते आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका