शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील भक्ती वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 13:43 IST

The death of Bhakti tigers's calf महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात वीर पांढरा वाघ आणि भक्ती पिवळी वाघीण या जोडीपासून ३ एप्रिल रोजी भक्तीने दोन गोंडस पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता.

ठळक मुद्दे १० एप्रिल रोजी पहिल्या बछड्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या बछड्याचीही तब्येत अधिकच नाजूक झाली.

औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील भक्ती वाघिणीने दिलेल्या दोनपैकी एका बछड्याचा चार दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. भक्तीत मातृत्वाची भावना नसल्याने ती दुसऱ्या बछड्यालाही दूध पाजत नव्हती. त्यामुळे या बछड्याची प्रकृती दोन दिवसांपासून अधिकच खालावली होती. दरम्यान, बुधवारी रात्री साडेदहा वाजता या बछड्यानेही अखेरचा श्‍वास घेतला. गुरूवारी सकाळी बछड्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात वीर पांढरा वाघ आणि भक्ती पिवळी वाघीण या जोडीपासून ३ एप्रिल रोजी भक्तीने दोन गोंडस पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. सिद्धार्थ उद्यानातील या भक्ती वाघिणीची बछडे देण्याची ही पहिलीच वेळ होती. बछड्यांना जन्म दिल्यानंतर तिच्यात मातृत्वाची भावना दिसून आली नाही. त्यामुळे भक्ती वाघीण ही बछड्याची काळजी घेत नव्हती. तसेच दूधही पाजत नव्हती. त्यामुळे बछड्यांना ठराविक अंतराने बकरीचे दूध पाजण्यात येत होते. दरम्यान ६ एप्रिलच्या रात्री भक्ती वाघीण पिंजऱ्यात फिरत असताना एका बछड्यावर तिचा पाय पडला होता. त्यानंतर त्या बछड्याने दूध पिणे बंद केले. १० एप्रिल रोजी या बछड्याचा मृत्यू झाला. 

त्यानंतर दुसऱ्या बछड्याचीही तब्येत दोन दिवसांपासून अधिकच नाजूक झाली. या स्थितीतही प्राणिसंग्रहालय प्रशासन खडकेश्‍वर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून या बछड्यास जगवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र बुधवारी रात्री साडेदहा वाजता या बछड्यानेही जगाचा निरोप घेतला. गुरूवारी सकाळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अश्‍विनी राजेंद्र यांनी बछड्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. तांबे, वनपरिमंडळ अधिकारी ए.डी. तांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बछड्याचे अंत्यसंस्कार करून पंचनामा करण्यात आला.

टॅग्स :TigerवाघAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका