शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धोरणाच्या कचाट्यात रुतली धरणांची योजना, मराठवाडा वॉटरग्रीड; निविदा गुंडाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 07:11 IST

Rutli dam project : योजनेचे तोटे आणि फायदे सांगणारे वेगवेगळे मतप्रवाह असल्यामुळे ग्रीडची योजना यशस्वी होणार काय, हे सांगणे कठीण आहे.

-   विकास राऊत

औरंगाबाद : राज्यात सरकार बदलताच मराठवाडा वॉटरग्रीड योजना धोरणाच्या कचाट्यात अडकली आहे. १२ महिन्यांपासून योजनेची व्यवहार्यता तपासण्याचा मुद्दा पुढे करून विद्यमान सरकारने या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निविदाही गुंडाळून ठेवल्या आहेत. योजनेचे तोटे आणि फायदे सांगणारे वेगवेगळे मतप्रवाह असल्यामुळे ग्रीडची योजना यशस्वी होणार काय, हे सांगणे कठीण आहे.

वॉटरग्रीडच्या योजनेत नेमके काय आहे?१,३३० कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी३,२२० कि.मी.ची जलवाहिनी प्रत्येक तालुक्यात पाणी देण्यासाठी  १०,५९५ कोटी पहिला टप्पा तरतूद ३,८५५ कोटींचा खर्च अशुद्ध पाणी, मुख्य जलवाहिनीसाठी २०५० पर्यंत ९६० दशलक्ष मीटर पाण्याची गरज

११ धरणे एकमेकांशी जोडणे प्रस्तावितजायकवाडी, उजनी, येलदरी, सिद्धेश्वर, विष्णुपुरी, सीना कोळेगाव, माजलगाव, निम्न तेरणा, निम्न मनाड, इसापूर, पैनगंगा ही ११ धरणे मोठ्या बंद जलवाहिनीने जोडून दुष्काळी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचा आराखडा तयार करण्यात आला.

सरकारी ‘धोरण’ कधी ठरणार?गेल्या विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मराठवाडा वॉटरग्रीडच्या कामाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन होते. २२ कोटींतून इस्राइलच्या कंपनीने डीपीआरचे काम पूर्ण केले. शेती, पिण्यासाठी, उद्योगांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन ग्रीडमध्ये करण्यात आले. या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी मंजूर केल्याचा दावा गेल्या सरकारने केला होता.

ग्रीडमधील वापरण्यात येणाऱ्या जलवाहिनीचा व्यास हा मोठी कार जाईल एवढा मोठा असेल, असे सांगण्यात आले होते. 

इस्राइलच्या कंपनीने जिल्हानिहाय टेंडर काढले होते. जानेवारीत मराठवाडा वित्त व नियोजन आढावा बैठकीत योजनेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. सरकार योजनेची व्यवहार्यता तपासेल. त्यानंतर, पुढे जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर, कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे आजवरचा काळ आरोग्य उपाययोजनेत गेल्याने त्या योजनेसाठी सरकारी ‘धोरण’ ठरले नाही.

ही योजना तांत्रिकदृष्ट्या योग्य नाहीतांत्रिकदृष्ट्या ही योजना व्यवहार्य नाही. याबाबत गेल्या वर्षी सादरीकरण केले होते. भौगोलिक आणि तांत्रिकदृष्ट्या या योजनेचा काहीही फायदा होणार नाही. त्याबाबत शासनाला पत्रव्यवहारदेखील केला होता. ही योजना यशस्वी होणे शक्य नाही. जालना येथे कार्यशाळाही घेतली होती. हे अव्यहार्य आहे, याबाबत चर्चा झाली होती. ११ धरणे एकमेकांना जोडण्यात काहीही अर्थ नाही. त्यातून काहीही साध्य होणार नाही.- प्रा. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ 

ग्रीडची योजना लाभकारी असेल मराठवाड्यापुरते ११ प्रकल्प घेण्याऐवजी नाशिकपासून ही योजना राबविणे गरजेचे आहे. नाशिकच्या अर्ध्या भागाकडे जाण्याऐवजी तिकडून जलवाहिनी टाकली जावी. मोठ्या आणि लहान प्रकल्पांना जोडण्याची ही योजना आहे. बहुविध वापर होईल, अशी योजना असून, ती एकांगी होऊ नये. फक्त मराठवाड्यापुरती योजना नसावी. पिण्याच्या पाण्यासाठी योजना नको. ग्रीडची योजना लाभकारीच ठरणारी आहे. - शंकर नागरे, माजी तज्ज्ञ सदस्य मराठवाडा विकास मंडळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्र