शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War:'युक्रेनमध्ये अडकलेल्या तुमच्या मित्रांना सांगा, नरेंद्र मोदी सर्वांना मायदेशी आणतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 20:32 IST

Operation Ganga: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे(Russia-Ukraine War) हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान परतले. हे विमान औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी मायदेशात परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि त्यांना धीरही दिला.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?विमान दाखल झाल्यानंतर मंत्री रावसाहेब दानवे विमानात गेले आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने तुमचे स्वागत करतो. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे, तिकडे आपल्या देशातील हजारो लोक अडकले आहेत. त्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे, याअंतर्गत तुम्ही भारतात सुखरुप आला आहात,' असं ते म्हणाले.

विद्यार्थ्यांसाठी रेल्वेची व्यवस्थादानवे पुढे म्हणतात की, 'अजून अनेकजण तिकडे अडकले आहेत. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा की, त्यांना चिंता करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची चिंता आहे. त्या सर्वांना लवकरात लवकर भारतात परत आणले जाईल', अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, औरंगाबादवरुन आपापल्या घराकडे जाण्यासाठी विमानतळावर रेल्वेचे तिकीट मिळण्यासाठी एक बुकींग काउंटर सुरू करण्यात आले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 80 उड्डाणे तैनात युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारने बचाव कार्याला गती दिली आहे. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'(Operation Ganga) सुरू केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मायेदशात परत आणण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारने या मिशनवर देखरेख ठेवण्यासाठी दोन डझनहून अधिक मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी 10 मार्चपर्यंत एकूण 80 उड्डाणे तैनात करण्याचे नियोजन आहे. ही उड्डाणे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइस जेट, विस्तारा, गो एअर आणि एअर फोर्सची आहेत. या 80 फ्लाइट्समधून सुमारे 17,000 भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढले जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाraosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबाद