शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयातील अस्वच्छतेवर रुपाली चाकणकरांची तीव्र नाराजी 

By संतोष हिरेमठ | Updated: September 5, 2023 20:05 IST

अंतरवाली सराटीतील लाठीमारात जखमी झालेल्या तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

छत्रपती संभाजीनगर : घाटीत मंगळवारी जागोजागी  अस्वच्छता  पाहून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अंतरवाली सराटीतील लाठीमारात जखमी झालेल्या शरद नरवडे या तरुणाची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अस्वच्छता पाहून त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजय कल्याणकर यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. या अवस्थेसाठी जबाबदार अधिष्ठातांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आयोगाच्यावतीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे केली, असे रुपाली चाकणकर यांनी नमूद केले. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. घाटी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात दाखल रुग्णांचीही त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.

ट्विटरवर देखील व्यक्त केली नाराजीआज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असताना शासकीय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल इथे भेट दिली.अतिशय अस्वच्छ,दुर्गंधी,कचऱ्याचे ढीग, गुटखा तंबाखूच्या पिचकाऱ्या अशी अवस्था शासकीय रुग्णालयाची आहे. जिथे सामान्य नागरीक उपचारासाठी येतात तिथे स्वच्छता ही अतिशय मूलभूत अपेक्षा आहे. तिथेच जर अशी अवस्था असेल तर रुग्णांच्या बाबतीत कशी काळजी घेत असतील हा प्रश्नच आहे.रुग्णालयात स्वच्छता राखण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांचीही आहे. जिथे आपण आपल्या माणसांना उपचारासाठी आणतो तिथेच कचरा करणे,गुटखा तंबाखूच्या पिचकाऱ्या मारणे योग्य नाही.रुग्णालयाच्या या अवस्थेसाठी जबाबदार अधिष्ठाता यांचेवर कारवाई व्हावी,अशी मागणी आयोगाच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे, अये ट्विट चाकणकर यांनी केले आहे.

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी