शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत बिबट्या ही अफवा; व्हिडिओ बंगळुरूचा, सांगितले भावसिंगपुऱ्यातील

By साहेबराव हिवराळे | Updated: February 6, 2023 14:52 IST

व्हायरल व्हिडिओ आणि मेसेजमुळे नागरिकांमध्ये घबराट

औरंगाबाद: 'साकेत नगरच्या साई ग्राउंडच्या संरक्षक भिंतीवर बिबट्या फिरत असून परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी', असा मेसेज आणि यासोबत एक व्हिडिओ रविवारी रात्री व्हायरल  झाला. यामुळे विद्यापीठ, पेठे नगर, साकेत नगर, निसर्ग कॉलनी येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मात्र, मेसेज सोबतचा व्हिडिओ औरंगाबाद येथील नसल्याचा निर्वाळा करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

शहरात बिबट्या फिरत असल्याचा मेसेज रविवारी रात्री व्हायरल झाला. सोशल मीडियात काही वेळातच यावर चर्चा सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली. एका व्हिडिओसोबत लाल माती परिसरात 'साई' येथील मैदानाच्या संरक्षक भिंतीवर बिबट्या फिरत असल्याचा मेसेज होता. मात्र, कसलीही शहानिशा न करत सर्वांनी मेसेज फॉरवर्ड केला. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थी, साकेत नगर, पेठे नगर आणि निसर्ग कॉलनीतील नागरिकांमध्ये घबराट पसरली.

व्हिडिओ बंगळूरूचा, सांगितले औरंगाबादचा दरम्यान, हा व्हिडिओ औरंगाबाद येथील नसल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. व्हिडिओ बंगळुरू येथील विद्यापीठ परिसरातील असून युट्यूबवर प्रदर्शित झालेला असून अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी  दादासाहेब तौर केले आहे. कोणीतरी खोडसाळपणा करून राहुरी येथील व्हिडिओ औरंगाबादचा असल्याचा खोटा मेसेज व्हायरल केला. यामुळे अफवा पसरवणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, हाच व्हिडिओ राहुरी येथील असल्याची देखील अफवा आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforest departmentवनविभागDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद