लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जून महिन्याची १३ तारीख उलटली, पण अजूनही रिझर्व्ह बँकेने शहरासाठी नोटांचे कंटेनर पाठविले नाही. यामुळे बहुतांश एटीएममध्ये खडखडाट आहे. पगारी आठवडा संपत आला आहे; मात्र अनेक कर्मचाऱ्यांच्या हाती अजूनही पूर्ण पगार मिळाला नाही, कारण एटीएममध्ये नोटाच नाहीत. काही राष्ट्रीयीकृत बँकांंचा अपवाद वगळला तर अनेक बँकांमध्ये पूर्ण रक्कम दिली जात नाही. काही बँका परजिल्ह्यातील बँकांमधून रक्कम मागवून दररोजचे व्यवहार पूर्ण करीत आहेत. रक्कम मिळण्याची शाश्वती नसल्याने अनेकांनी आता बँकेत पैसे जमा करण्यापासून हात आखडता घेतला आहे.
१३ दिवसांपासून एटीएममध्ये खडखडाट
By admin | Updated: June 14, 2017 00:38 IST