शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'सामना सुरु झाल्यास नियम बदलता येत नाहीत'; आरोग्य परिचारिका पदाच्या भरती प्रक्रियेला ‘मॅट’ची अंतरिम स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 16:50 IST

जाहिरात प्रकाशित झाली त्यादिवशी लागू असलेले भरती नियम हे अंतिम मानल्यास भरती प्रक्रियेच्या समाप्तीनंतर पात्रतेचे निकष बदलणे चूक आहे

औरंगाबाद : जाहिरात आणि परीक्षेनंतर पात्रतेचे निकष बदलून उमेदवारांना नियुक्तीपासून वंचित ठेवल्याने, सार्वजनिक आरोग्य परिचारिका पदाची चालू भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे अंतरिम आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. डी. डोंगरे व प्रशासकीय सदस्य बिजयकुमार यांनी दिले आहेत. पुढील सुनावणी १ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे.

असा आहे मूळ अर्जयाबाबत माहिती अशी की, २१ फेब्रुवारी २०१९ रोजी पाठ्यनिर्देशिका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बालरूग्णतज्ज्ञ परिचारिका आणि मनोरूग्णतज्ज्ञ परिचारिका या ४ संवर्गांसाठीच्या पदभरतीची जाहिरात सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली होती. या जाहिरातीत नमूद पात्रतेचे निकष १० जानेवारी १९६४ रोजीच्या भरती नियमांशी सुसंगत होते. जाहिरातीनुसार याचिकाकर्त्यांनी परीक्षा फॉर्म भरले. परीक्षेच्या एक दिवस अगोदर नवे भरती नियम प्रकाशित करण्यात आले. परीक्षा पार पडली. परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर आरोग्य खात्याने एक जाहीर सूचना प्रकाशित करून झालेल्या परीक्षेस नवे भरती नियम लागू असतील, असे सूचित केले. एकदा भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पात्रतेचे निकष बदलणे अन्यायकारक असल्याने याचिकाकर्त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली. न्यायाधिकरणाने नोटीस बजावून, अनेकवेळा संधी देऊनही आरोग्य खात्याने कसलाही जबाब दाखल केला नसल्याने सार्वजनिक आरोग्य परिचारिका पदासाठीची नियुक्तीपत्रे पुढील तारखेपर्यंत देण्यात येऊ नयेत, असा आदेश न्यायाधिकरणाने दिला होता.

नियम बदलता येत नाहीतएकदा ‘सामना सुरू झाल्यावर खेळाचे नियम बदलता येत नाहीत’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जाहिरात प्रकाशित झाली त्यादिवशी लागू असलेले भरती नियम हे अंतिम मानल्यास भरती प्रक्रियेच्या समाप्तीनंतर पात्रतेचे निकष बदलणे चूक आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. दि. ८ मार्च २०१९ रोजी एक शुध्दीपत्रक प्रकाशित करून नव्या पात्रता निकषांबाबत उमेदवारांना माहिती देण्यात आली होती, असा मुद्दा आरोग्य खात्याच्यावतीने सरकारी वकिलांनी मांडला. तर याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. चैतन्य धारूरकर काम पाहत आहेत. त्यांना ॲड. अजिंक्य मिरजगावकर व ॲड. मयूर सुभेदार सहकार्य करत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ