तुळशीदास घोगरे , घनसावंगीशिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सर्व नियमांना डावलून अवघ्या सहा तासातच गुंडाळल्याने खेळांडूची या स्पर्धेदरम्यान मोठी गैरसोय झाली.तालुक्यातील १२ केंद्रातंर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या संघाची व खेळांडूची तालुका स्तरीय स्पर्धा गुरूवारी येथील एका महाविद्यालयात घेण्यात आली. या स्पर्धेत कबड्डीचे २४ संघ, खो- खोचे २४, धाावने ११७, दोरी खेळणे ११७ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धा १ ली ते५ वी व ६ वी ते ८ वी या दोन गटात तालुका गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. ज्या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या त्या ठिकाणी मैदानावर लाल माती नव्हती. खो- खो साठी ६ फुट उंचीचा पोल होता. तसेच एक खांब झुकलेला होता. मैदानात दगडे, काटेरी गवत होते. मैदानावर चूना मार्किग केलेली नव्हती.कबड्डी , खो ५ खो एकाच डावात घेण्यात आल्या. खेळाच्या नियमांना खो देत ह्या स्पर्धा अवघ्या सहा तासातच गुंडाळण्यात आल्या. स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नास्त्याची व्यवस्था नव्हती. पाणीही दुपारनंतर संपले होते. येवड्या ढिसाळ नियोजनात या स्पर्धा पार पडल्या. तालुकास्तरीय क्रीडा संकुलात कोणतीही सुविधा नसल्याने ह्या स्पर्धा एका महाविद्यालयात घेण्यात आल्या मात्र त्याठिकाणीही सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या खेळांडूची मोठी गैरसोय झाली.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नियमांना खो
By admin | Updated: February 6, 2015 00:55 IST