शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वंचितमध्ये ‘आरएसएस’ची मंडळी!; खासदार एम्तियाज जलील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 01:58 IST

आमची ताकद आम्ही दाखवून देणार

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) निगडित माणसे शिरली आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी ‘एमआयएम’सोबतची युती तोडली, असा खळबळजनक आरोप खा. इम्तियाज जलील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. आम्हाला फक्त ८ जागा देण्यात आल्या. दोन महिने आमच्यासोबत चर्चेचे गुºहाळ सुरू होते. दुसरीकडे काँग्रेससोबतही बोलणी सुरू ठेवली. आम्ही आता स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत, असेही जलील यांनी जाहीर केले.

पत्रकार परिषदेत जलील यांनी मागील दोन महिन्यांत एमआयएम आणि वंचितमध्ये जागा वाटपासाठी कशी चर्चा झाली याची माहिती दिली. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर दोघेच चर्चा करीत होते. त्यांच्या सूचनांवरून आम्ही अगोदर ९८ व नंतर ७४ जागांची यादी वंचितला दिली. परंतु आम्हाला फक्त ८ जागा देण्यात आल्या. वंचितने आम्हाला किमान ४० ते ५० जागा दिल्या पाहिजेत. आमच्याकडे व्होट बँक नाही, असे वारंवार सांगण्यात येत आहे. राज्यात आमचे १५० नगरसेवक आहेत. आमची व्होट बँक किती हे विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा इशाराही जलील यांनी दिला.

मुळात सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात वेगळी आघाडी तयार करण्यासाठी एमआयएम-वंचित बहुजन एकत्र आले. वंचितच्या पार्लमेंटरी बोर्डातील सदस्य आपली स्वत:ची ओळख मला करून देताना म्हणाले की, माझ्यामागे दोन कोटी लोक आहेत. मग अशा मंडळींनी मुख्यमंत्री व्हावे, असा टोलाही जलील यांनी मारला.ओवेसींना विचारून पत्रक काढलेआघाडी तोडण्यासंदर्भातील पत्र मी पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची परवानगी घेऊनच प्रसिद्धीस दिले. वंचितचे प्रवक्ते, नेते काहीही बोलत आहेत. विनाकारण मला ‘व्हिलन’ठरविण्यात येत आहे. आजही वंचितची मंडळी बोलणी सुरू असल्याचे सांगत आहे. पण नेमकी कोणासोबत, हे सांगावे. अलीकडेच एमआयएमला १७ जागा दिल्याची अफवा पसरविण्यात आली. हा आकडा नेमका आला कोठून हे वंचितने सांगावे.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी