शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

७० कोटी रुपये कर्जाच्या आमिषाने मुंबईतील दलालांकडून पावणेनऊ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:25 IST

औरंगाबाद : दरसाल दर शेकडा ७ रुपये दराने तब्बल ७० कोटी रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील कथित फायनान्स ...

ठळक मुद्दे क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा : आरोपींचा शोध सुरू

औरंगाबाद : दरसाल दर शेकडा ७ रुपये दराने तब्बल ७० कोटी रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील कथित फायनान्स कंपनी आणि दोन दलालांनी शहरातील एक जणाला तब्बल ८ लाख ८९ हजार रुपयांचा गंडा घातला. २४ मे २०१७ ते २३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत झालेल्या या फसवणूकप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.दिनेश जैन, अशरफ खान, सुनील संकपाळ, जितू आणि विपुल पांडे, अशी गुन्हा दाखल झालेल्या दलाल आणि के. के. जैन फायनान्स कंपनीचे संचालक, व्यवस्थापकांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, भाग्यनगर येथील मनोज सुरेशचंद्र बाकलीवाल हे रिअल इस्टेट ब्रोकर आहेत. मुंबईतील दलाल सुनील आणि जितू हे त्यांच्या ओळखीचे आहेत. मनोज यांना व्यवसाय वाढवायचा असल्याने त्यांना पैशाची आवश्यकता आहे, ही बाब सुनील आणि जितू यांना माहीत होती. मुंबईतील के. के. जैन फायनान्स क ॉर्पोरेशनकडून तुम्हाला कर्ज मिळवून देतो, असे सुनीलने मनोज यांना जून २०१७ मध्ये सांगितले. तेव्हा मनोज यांनी त्यांना किती क र्ज मिळेल, अशी विचारणा करून सांगितले की, त्यांच्याकडे बीड बायपासवर ८० कोटी रुपये किमतीची मालमत्ता आहे. तेव्हा फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अशरफ खान आणि दिनेश जैन यांना विचारून सांगतो, असे सुनील म्हणाला. त्यानंतर काही दिवसांनी मनोज हे कामानिमित्त मुंबईला गेले असता सुनील आणि विपुल पांडे यांनी त्यांची ओळख अशरफ खानसोबत करून दिली. त्या दिवशी दिनेश हे बाहेरगावी होते. सुनीलने त्यांना सांगितले की, तुमच्या मालमत्तेच्या किमतीच्या ९० टक्के म्हणजे ७० कोटी रुपये तुम्हाला कर्ज मिळेल. कर्जाचा व्याजदर ७ टक्के असेल. तुम्हाला एक लाख रुपये कंपनीकडे सुरक्षा रक्कम म्हणून जमा करावी लागेल. या रकमेवर २५ टक्के दराने व्याज मिळेल; परंतु ती रक्कम तुम्हाला काढता येणार नाही. शिवाय प्रोसेसिंगसाठीचा खर्च करावा लागेल. तुम्ही विपुल आणि सुनील यांच्या खात्यावर पैसे जमा करा, असे अशरफने सांगितले. मनोज यांनी प्रथम एक लाख रुपये सुनीलने दिलेल्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे आॅनलाईन वर्ग केले. त्यानंतर ७ लाख ३० हजार आणि रोखीने २ लाख ५९ हजार रुपये आॅनलाईन अदा केले. पैसे घेतल्यानंतर त्यांनी कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनोज यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक जी. पी. सोनटक्के तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी