शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षणाधिकाऱ्यांना 50 हजार रुपये ‘कॉस्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 11:35 IST

नांदेडचे प्रकरण : खंडपीठाच्या आदेशाचे केले नाही पालन

ठळक मुद्देयाचिकाकर्त्याची नियुक्ती झालेले पद १०० टक्के अनुदानित असल्याने नांदेड येथील प्रतिभा निकेतन प्राथमिक शाळा आणि अध्यक्षांनी याचिकाकर्त्याच्या पगाराची १८ फेब्रुवारी २०१४ पासूनची थकबाकीची निर्धारित दराने मोजून  ३० सप्टेंबरपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांकडे बिल पाठवावे

औरंगाबाद : अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसंबंधी शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून, खंडपीठाच्या आदेशाचे चार वेळा पालन न करता याचिकाकर्त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवल्याच्या प्रकरणात नांदेड  येथील तत्कालीन शिक्षण अधिकारी एस. एस. सोनटक्के यांना  औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. एस. जी. मेहरे यांनी  ५० हजार रुपये ‘कॉस्ट’ लावली आहे. सोनटक्के यांनी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत स्वत:च्या बँक खात्यातून ५० हजारांचा ‘अकाउंट पेयी’ धनादेश याचिकाकर्ता सय्यद असद  सय्यद युसूफ यांना द्यावा. त्यांनी खंडपीठाच्या या निर्देशाचे  पालन केले नाही तर याचिकाकर्त्याला सोनटक्के यांच्याविरुद्ध खंडपीठात योग्य ती कारवाई करण्याची मुभा दिली आहे. 

याचिकाकर्त्याची नियुक्ती झालेले पद १०० टक्के अनुदानित असल्याने नांदेड येथील प्रतिभा निकेतन प्राथमिक शाळा आणि अध्यक्षांनी याचिकाकर्त्याच्या पगाराची १८ फेब्रुवारी २०१४ पासूनची थकबाकीची निर्धारित दराने मोजून  ३० सप्टेंबरपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांकडे बिल पाठवावे. त्यांनी ते बिल मंजूर करून याचिकाकर्त्याला  ३० ऑक्टोबरपर्यंत ही रक्कम मिळावी यासाठी निधी द्यावा, असे आदेशात म्हटले आहे. 

काय होती याचिका nवैयक्तिक मान्यता नाकारण्याचे हे प्रकरण आहे. यासंदर्भात व इतरांनी ॲड. विलास पानपट्टे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. nयाचिकेनुसार नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत याचिकाकर्ता सय्यद असद सय्यद युसूफ याला अनुकंपा तत्त्वावर खासगी संस्थेने शिपाई पदावर नियुक्ती दिली हाेती.n त्याच्या  नियुक्तीस तत्कालीन शिक्षणाधिकारी साेनटक्के यांनी संच मान्यतेस पद मंजूर नाही या कारणास्तव २० जानेवारी २०१८ च्या आदेशानुसार  नियुक्तीस वैयक्तिक मान्यता नाकारली होती.

खंडपीठाच्या आदेशाने याचिकाकर्त्याच्या नियुक्तीला मान्यता nही दुर्दैवी बाब आहे की, अनेक शिक्षणाधिकारी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसंबंधीच्या शासन निर्णयाचा योग्य अर्थ  आणि उद्देश  समजत नाहीत. अर्थ  समजला नाही तर कायदेशीर सल्लाही घेत नाहीत.nपरिणामी याचिकाकर्त्यासारख्या पक्षकारांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. म्हणून याचिकाकर्त्याच्या नियुक्तीला मान्यतेचे प्रकरण शिक्षणाधिकाऱ्यांकडे न पाठविता उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्या नियुक्तीला मान्यता देत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयTeacherशिक्षक