लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत नागरी सुविधांसाठी रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया गुरूवारी आक्रमक झाली होती. पालिकेसमोर निदर्शने करण्याबरोबरच गैरहजर मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला चपलांचा हार घालण्यात आला. घोषणाबाजीने पालिका परिसर दणाणून गेला होता.बीडमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. याशिवाय शहरात चांगले रस्ते नसून सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. शहरातील सर्वच भागातील नाल्या तुंबलेल्या असून थोडाही पाऊस झाला तरी नाल्यांतील पाणी रस्त्यांवर येते. यामुळे नागरिकांना दुर्गंधिचा सामना करावा लागत आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील वीज बहुतांश भागातील गुलच असते. शहरवासीयांना वेळेवर शुद्ध पाणी मिळत नाही आदी नागरी सुविधांचे प्रश्न सोडविण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.पालिकेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या घरकुलांची थकित रक्कम तत्काळ देण्यात यावी, नवीन घरकुलांना तत्काळ मंजुरी देण्यात यावी, बीड शहर खड्डेमुक्त करण्यासाठी शहरात नवीन रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावीत, शहरातील घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी पालिकेचे जातीयवादी मुख्याधिकारी जावळीकर यांना बडतर्फ करण्यात यावे, पालिकेचे भ्रष्टाचारी रोजंदारी अभियंता अखिल फारोखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, सफाई कामगारांना समान काम-समान वेतन देवून सेवेत कायम नियुक्ती द्यावी आदी मागण्यांसाठी रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी पालिकेसमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांविरोधात झालेल्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.निदर्शनांमध्ये राजु जोगदंड, किसन तांगडे, सुभाष गायकवाड, मझहर खान, दिलीप खंदारे, श्री.जुबेर, सिद्दीक फारोखी, अविनाश जोगदंड, संगिता वाघमारे, प्रभाकर चांदणे, श्रीकांत साबळे, बंटी कागदे, अमर विद्यागर, दिपक अरूण, मिलींद पोटभरे, गोट्या वीर, नितीन जोगदंड, नुरूल खान, भालचंद्र मराठे, अॅड.सुरेश वडमारे, अंकुश गंगावने, बाबासाहेब शिंदे, विनोद शिंदे, अमोल शिंदे, कल्याण शिंदे, शरद शिंदे, बंडू गायकवाड, भाऊसाहेब कांबळे, राहूल सिरसट, भैय्या वाघमारे, रेवननाथ कसबे, चिंतामन वाघमारे, भाऊसाहेब दळवी, कृष्णा साबळे, आकाश साबळे, नितेश साबळे आदी सहभागी झाले होते.
पालिकेविरोधात रिपाइं आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:33 IST