शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची ‘एकला चलो रे’ची भूमिका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:31 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा केलेला निर्धार कायम आहे. मराठवाड्यातील लोकसभा आणि विधासनसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार आणि पक्षपरिस्थितीचा ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादेत आढावा घेतला.

ठळक मुद्देऔरंगाबाद : पक्षप्रमुखांकडून मराठवाड्यातील लोकसभा, विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा केलेला निर्धार कायम आहे. मराठवाड्यातील लोकसभा आणि विधासनसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार आणि पक्षपरिस्थितीचा ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादेत आढावा घेतला.केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना पक्षाच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत ‘एकला चले रो’ची घोषणा केली होती. यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला गोंजारणे सुरू केले होते. तसेच भाजप शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचेही स्पष्ट केले. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ‘स्वबळा’चा नारा कायम असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा ठाकरे यांनी घेतला. मागील दीड महिन्यापूर्वी शिवसेनेतर्फे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निरीक्षक पाठवून परिस्थितीची पाहणी केली होती. याचे अहवालही आजच्या बैठकीत पक्षप्रमुखांना सादर करण्यात आले. यात प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील इच्छुक, त्यांची ताकद, पक्षाची ताकद किती आहे, याची माहिती सादर केली. याशिवाय पक्षप्रमुखांनी संबंधित जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, जिल्हाप्रमुख, जिल्हा उपप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्याशी संभाव्य नावांबाबतही माहिती जाणून घेतली आहे.अनेक पदाधिकाऱ्यांची दांडीमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाºयांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला अनेक जिल्ह्यांतील काही प्रमुख पदाधिकाºयांनी दांडी मारली असल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने उस्मानाबादचे खासदार प्रा. रवी गायकवाड यांचा समावेश होता.चौकट,दानवाच्या वधासाठी अर्जुनाने धनुष्यबाण रोखलायपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. दानवाचा वध करण्यासाठी अर्जुनाने धनुष्यबाण रोखला असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMarathwadaमराठवाडा