शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

भारताला विकसित देश बनविण्यासाठी ‘सीएं’ची भूमिका महत्त्वाची: भागवत कराड

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 7, 2022 14:40 IST

'द्रारिद्र्य निर्मूलन होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. त्यासाठी गरीबांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी ‘सीएं’नी आपले योगदान द्यावे.''

औरंगाबाद: ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे तोच देश विकास करू शकतो. आपल्यावर १५९ वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनला मागे टाकून आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे. भारताला विकसित देश बनविण्यासाठी चार्टर्ड अकाैंटंटची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ‘सीएं’ना मोठी मागणी असून, त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाैंटंट्स ऑफ इंडिया’ने गुरुवारी (दि. ६) आयोजित दीक्षांत सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते. सातारा परिसरातील ‘आईसीएआय’ भवनात पश्चिम विभागातील १५० नवीन पात्र चार्टर्ड अकाैंटंट्सला या सोहळ्यात पदवी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. के. व्ही. एस. सरमा यांची विशेष उपस्थिती होती.

डाॅ. कराड यांनी सांगितले की, द्रारिद्र्य निर्मूलन होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. त्यासाठी गरीबांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी ‘सीएं’नी आपले योगदान द्यावे.भारतातील न्यायिक प्रणालीमध्ये सहभागी होण्यासाठी व अनेक आर्थिक केसेसचा उलगडा करण्यासाठी ‘सीएं’नी कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घ्यावा़, असे आवाहन राष्ट्रीय विधी विद्यापीठ कुलगुरू डॉ. सरमा यांनी केले.

तत्पूर्वी सीए संघटनेचे अध्यक्ष देबशीस मित्रा व उपाध्यक्ष अनिकेत तलाठी यांनी दिल्लीहून ऑनलाईन मार्गदर्शन केले. केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सीए उमेश शर्मा यांनी चार्टर्ड अकौंटंटच्या प्रत्येक स्पेलिंगचा अर्थ समजावून सांगितला व नव्याने पात्र ठरलेल्या ‘सीएं’ना शपथ दिली. प्रारंभी, सीए स्थानिक शाखेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष गणेश भालेराव, सचिव केदार पांडे, कोषाध्यक्ष अमोल गोधा, विकासा चेअरमन महेश इंदाणी, शाखा समितीच्या सदस्या रूपाली बोथरा यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

पूर्वी कुरिअरद्वारे मिळत असे पदवीसीए उमेश शर्मा यांनी सांगितले की, पूर्वी कुरिअरने पदवी मिळत असे. औरंगाबादेत दीक्षांत सोहळा आयोजित करावा, अशी सर्वांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवत