शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पेट्रोल पंपाच्या मँनेजरवर हल्ला करून साडेपाच लाख रूपये लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 17:54 IST

Verul Robbery Case : वेरूळ येथील पेट्रोल पंपांचे मँनेजर अशोक गोपीनाथ काकडे हे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शनिवार व रविवारची पेट्रोल पंपांचे जमा झालेले ५ लाख ३७ हजार रूपये बँकेत जमा करण्यासाठी मोटारसायकलवर जात होते.

ठळक मुद्देपोलीसांनी चारजणांसह रोख रकम व दोन दुचाकी केल्या जप्त केल्यापोलीस चौकशीत संशयितांनी आणखी एकाच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले.

खुलताबाद ( औरंगाबाद ) : वेरूळ येथील पेट्रोल पंपांचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या मँनेजरवर हल्ला करून साडेपाच लाख रूपये लंपास करणाऱ्या टोळीला खुलताबाद पोलीसांनी जेरबंद केले आहे. गुन्ह्याचा तपास ४८ तासात करत आरोपींच्या मुसक्या आवळल्याने ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी खुलताबाद पोलिसांना १० हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वेरूळ येथील पेट्रोल पंपांचे मँनेजर अशोक गोपीनाथ काकडे हे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शनिवार व रविवारची पेट्रोल पंपांचे जमा झालेले ५ लाख ३७ हजार रूपये बँकेत जमा करण्यासाठी मोटारसायकलवर जात होते. वेरूळ येथील उड्डाण पुलाखाली काही जणांनी मँनेजर काकडे यांना अडवून  प्राणघातक हल्ला करीत त्यांच्याजवळील ५ लाख ३७ हजार रुपयांची बँग हिसकावून घेवून मोटारसायकलवरून पलायन केले. दरम्यान, पेट्रोल पंपांचे मालक विजय आसाराम बोडखे यांनी या संदर्भात खुलताबाद पोलीसात फिर्याद दिली होती. पोलीसांनी कलम ३९४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. 

तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांना महत्वाची माहिती हाती लागली. पेट्रोल पंपावरील कामावरून कमी केलेला प्रकाश कल्याण चुंगडे ( २१, रा. खापरखेडा ता. कन्नड ) याच्यावर संशयाची सुई फिरत होती. पोलीस निरीक्षक मेहत्रे यांनी प्रकाशची इत्यंभूत माहिती घेत तांत्रिक विश्लेषणाद्वारे महत्वाची माहिती गोळा केली. यानंतर पोलिसांनी तत्काळ प्रकाश कल्याण चुंगडे , महेंद्र रामदास सांळुके ( २१, रा. मजूर ता. वैजापूर) , नितीन घाशीराम राजपूत ( रा. खापरखेडा) , अर्जून मिठ्ठू ताटू ( रा. रूपवाडी ता. कन्नड ) यांना बुधवारी ( दिं. २१ ) ताब्यात घेतले. 

पोलीस चौकशीत संशयितांनी आणखी एकाच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपींकडून रोख रक्कम ३ लाख ११ हजार ६७० तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी किंमत ( ६० हजार) , तीन मोबाईल किंमत १५००० रूपये असा एकूण ३ लाख ८६ हजार ६७० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींना न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे, पोहेकॉ नवनाथ कोल्हे, यतीन कुलकर्णी, भगवान चरावंडे, के. के. गवळी, सुहास डबीर, कृष्णा शिंदे, रूपाली सोनवणे, रामदास दिवेकर, प्रमोद गरड यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादRobberyचोरी