शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित पोलिसाचे घर फोडून ३ लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 19:49 IST

एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णांच्या बंद घराची सुरक्षा वाऱ्यावर 

औरंगाबाद : कोरोनाबाधित  पोलीस हवालदाराचे बंद घर फोडून चोरट्यांनी ३  लाखांचे  सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख २२ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली. याप्रकरणी मंगळवारी हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 

एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या कुटुंबातील अन्य सात सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. ५ जुलै रोजी महापालिकेची बस उर्वरित कुटुंबाला कोविड सेंटर येथे नेण्यासाठी आली, तेव्हा घाईघाईत आतील दरवाजे न लावता केवळ समोरच्या लोखंडी गेटला कुलूप लावून ते रुग्णालयात गेले. संपूर्ण कुटुंब क्वारंटाईल होते व फक्त  गेटला कुलूप असल्याची संधी साधून चोरटे त्यांच्या घराच्या मागील बाजूच्या संरक्षक भिंतीवरून छतावर चढले. जिन्याचा दरवाजा उघडा असल्यामुळे चोरट्यांना खाली घरात सहज जाता आले. घराची आतील दारे उघडेच होते. शिवाय किल्ल्या कपाटालाच होत्या. चोरट्यांनी कपाट उघडून सोन्या-चांदीचे अलंकार आणि वस्तू, तसेच रोख २२ हजार रुपये घेऊन पलायन केले.  सोमवारी रात्री पोलीस हवालदार उपचार घेऊन घरी परतले तेव्हा त्यांना घराचा आतील दरवाजा उघडा दिसला. तसेच आतील कपाटातील  सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी या घटनेची माहिती हर्सूल पोलीस ठाण्याला कळविली. पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भागिले आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  

चोरट्यांनी काय पळविले ? : दोन तोळ्याच्या पुतळ्या, एक तोळ्याची एकदाणी, ८ ग्रॅमची पोत, ४ ग्रॅमचे लॉकेट, ७ ग्रॅमचे मणी, १ ग्रॅमचा ॐ, ३ ग्रॅमचे १५ मणी, २ ग्रॅमच्या अंगठ्या, ३ ग्रॅमची नथ, चांदीचा कंबरपट्टा, बाजूबंद, पूजेची चांदीची भांडी आणि रोख २२ हजार रुपये. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या बंद घराची सुरक्षा वाऱ्यावर कोरोनाबाधित व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन केले जात असेल तर त्या रुग्णाचे घर सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र, कोरोनाबाधितांची घरे फोडून किमती ऐवज चोरटे नेत आहेत. तरी याचा थांगपत्ता पोलिसांना लागत नाही. पंधरा दिवसांपूर्वी न्यायनगरातील एका रुग्णाचे घर चोरट्यांनी फोडले. कोरोनाबाधित पोलिसाचे घर फोडण्याचे धाडस चोरट्यांनी केले. बाधित घर परिसर सील करून पोलीस तेथे पोलीस पहारा असतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादRobberyचोरीPoliceपोलिस