शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पैठण प्राधिकरणांतर्गत रस्ते सुमार दर्जाचे; ठेकेदाराकडून खर्च वसूल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 19:50 IST

पैठण प्राधिकरणांतर्गत करण्यात आलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाचा दर्जा सुमार निघाल्याने भेगा पडण्यासह ‘स्ट्रेण्थ’ कमी असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर झाला.

औरंगाबाद : पैठण प्राधिकरणांतर्गत करण्यात आलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाचा दर्जा सुमार निघाल्याने भेगा पडण्यासह ‘स्ट्रेण्थ’ कमी असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर झाला. त्यानंतर या रस्त्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने डागडुजी करण्याचे आदेश संबंधित अभियंत्यांना देण्यात आले आहेत. यासाठी मुंबई, पुण्यातील तीन तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. याचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पैठण प्राधिकरणांतर्गत २०१२-१३ या आर्थिक वर्षात रस्ते काँक्रिटीकरणासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी १३ कोटी रुपये खर्चून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. याचे कंत्राट निविदा पद्धतीने देण्यात आले. मात्र, या कामात योग्य तो दर्जा न राखला गेल्याने काही दिवसांतच रस्त्यांवर भेगा पडल्याचे दिसून आले. 

या कामांबाबतच्या तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आल्या. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांनी चौकशीचे आदेश दिले. या कामाच्या चौकशीचा अहवाल काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला. या रस्ते कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरासह ‘स्ट्रेन्थ’ योग्य नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले, अशा पद्धतीच्या कामांमुळे निधीचा अपव्यय होत असल्याचे अहवालात म्हटले होते. त्यानंतर या रस्त्यांची डागडुजी शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. या कामात मुंबईतील आयआयटीयन्स डॉ. दोरजी, पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. जाधव यांच्यासह अन्य एका तज्ज्ञाची मदत घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील महिन्यात डागडुजीच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता अभियंत्यांनी व्यक्त केली. 

दक्षता व गुणनियंत्रण विभागाचे दुर्लक्ष?प्राधिकरणांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरूझाल्यानंतर या कामांची पाहणी व दर्जा दक्षता व गुणनियंत्रण विभागाने तपासला का, असा सवाल उपस्थित होतो. तो  तपासला असेल, तर या विभागाने या कामाबाबत काय पाऊल उचलले याची चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.  पैठण प्राधिकरणांतर्गतच्या रस्त्याच्या डागडुजीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल. - एस. एस. भगत, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाhighwayमहामार्ग