शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

देगावचाळ प्रभागात रस्ते, नाल्या झाल्या चकाचक

By admin | Updated: June 2, 2016 23:24 IST

नांदेड शहरातील देगावचाळ प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते,नाल्या, ड्रेनेजसह अनेक पायाभूत सुविधांची कामे झाल्यामुळे याभागात ९० टक्के विकासाची कामे पूर्ण झालेली आहेत

नांदेड शहरातील देगावचाळ प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते,नाल्या, ड्रेनेजसह अनेक पायाभूत सुविधांची कामे झाल्यामुळे याभागात ९० टक्के विकासाची कामे पूर्ण झालेली आहेत. प्रभागात देगावचाळ, नल्लागुट्टाचाळ, गोलचाळ, गंगाचाळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, बोरबन, भिमघाट व पक्कीचाळ आदी भाग येतात. एकेकाळी या भागात कोणत्याच पायाभूत सुविधांची कामे झालेली नव्हती, मात्र गेल्या काही वर्षामध्ये या प्रभागातील नगरसेवक गणेश धबाले यांच्या प्रयत्नामुळे अनेक कामे मार्गी लागली आहेत. भागातील एकही रस्ता कच्चा नाही, तसेच नाल्यांचीही नियमित सफाई होत असल्याने ड्रेनेजची कोणतीही समस्या नाही. याशिवाय सर्वच धर्मियांची समाजमंदिरे बांधून त्यांचे कंपाऊंडही बांधण्यात आलेली आहेत. या प्रभागात मुलभूत कामे सर्व झाली आहेत. मात्र सद्यस्थितीला प्रभागातील अनेक बोअरचे पाणी कमी झाल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. खा़चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे प्रभागाचा सर्वांगीण विकासकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शन आणि प्रयत्नामुळे देगावचाळ प्रभागात कोट्यावधी रुपयांची विकासकामे करता आली. प्रभागातील व्हिक्टोरिया भागात नळाचे पाणी जात नसल्याने येथे डबल पाईपलाईन केली आहे. येथील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी एकाच दिवसात ५० ते ६० अनधिकृत नळकनेक्शन बंद केले आहेत. विहाराचे काम पूर्ण केले आहे. तसेच दत्त मंदिराचे बांधकाम केले असून या भागातील १५० मीटर सिमेंट रस्त्याचे काम लवकरच होईल. तसेच भीमघाट येथे ७५ लाखांचे काम सुरु केले आहे. या भागातील सर्व सिमेंट रस्त्याची कामे पूर्ण केलेली आहेत. शिवाय ड्रेनेज आणि नाल्यांची कामेही पूर्ण झालेली आहेत. नाल्यांची नियमित साफसफाई करण्यात येते. नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे या भागातील बकरी मार्केट हाटवून त्या ठिकाणी बौद्ध विहार बांधण्यात आले आहे. विकासाची जवळपास ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी बोअरचे पाणी कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे उद्यापासून ज्या भागात पाणी जास्त येत नाही, त्या ठिकाणी टँकर सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोकळ््या जागेचे नाहरकरत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे येथे दवाखाना, वाचनालय आणि व्यायामशाळा बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. मात्र त्यासाठीही खा.अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करु.- विलास धबाले, शहर उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी, नांदेड.गणेश धबाले- नगरसेवकवार्डात स्वेच्छा निधीतून क्लब हाऊस ते डंकीनकडे जाणारा रस्ता, बीआरजीएफ अंतर्गत स्मशानभूमीची सुरक्षा भिंतीचे बांधकाम,क्लॅब हाऊस कडे जाणारा सिमेंट रस्ता,दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत भीमघाट येथे सिमेंट रस्ता, बोरबन भागात सीसी रोड, गंगाचाळ ते भीमघाट येथे भूमिगत गटार लाईन टाकणे आदी एक ते दीड कोटींची कामे प्रस्तावित आहेत. तर दलित वस्ती सुधार योजना व खासदार निधीतून विविध स्वरुपाची जवळपास ६ कोटींची कामे पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.२०० कोटी रुपयांची घरकुल योजना माजी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे मंजुर झाली होती. मात्र या भागातील जागा गुरुद्वारा बोर्डाची असल्याने सदर जागेचे महापालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जागेअभावी २०० कोटी रुपयांची घरकुल योजना परत गेल्याचे नगरसेवक गणेश धबाले यांनी सांगितले. जागा उपलब्धतेसाठी पाठपुरावा करु असेही त्यांनी सांगितले.