शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोट प्रकरणः प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
3
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
5
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
6
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
7
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
8
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
9
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
10
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
11
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
12
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
13
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
14
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
15
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
16
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
17
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
18
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
19
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
20
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!

रस्ता एक, बाता अनेक; राज्य सरकार बदल्याने रस्त्याचे काम थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 19:09 IST

वर्कआॅर्डर दिलेली असताना काम का बंद पडले, यावरून लोकप्रतिनिधींनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देजयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे हालमनपाने निविदेसह वर्कआॅर्डर मंजूर केली; परंतु नंतर ते काम बंद पडले

औरंगाबाद : राज्यात सरकार बदलले आणि जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम थांबले. गेल्या सरकारने विशेष निधीतून ५ कोटी मंजूर केले. मनपाने निविदेसह वर्कआॅर्डर मंजूर केली; परंतु नंतर ते काम बंद पडले. आता मनपाने लोकप्रतिनिधीतून ते काम होईल, असे जाहीर करून टाकले आहे, तर वर्कआॅर्डर दिलेली असताना काम का बंद पडले, यावरून लोकप्रतिनिधींनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. रस्ता एक आणि टोलवा-टोलवीच्या बाता अनेक, असा प्रकार सध्या सुरू असल्याचे दिसते आहे. 

जयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या वाहनचालकांसह पायी चालणाऱ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. तो रस्ता पूर्णत: खड्ड्यात गेला असून, पाच वर्षांपासून त्या रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाकडे कुणीही ढुंकून पाहिलेले नाही. रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या अनुषंगाने मालमत्ता पाडण्यात आल्या. मात्र, रुंदीकरण रखडले. शिवाय मनपाने आहे त्या रस्त्यावरील खड्डेदेखील बुजविलेले नाहीत. पावसाळ्यात त्या रस्त्यावरून जयभवानीनगर, विश्रांतीनगर, राजनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात जाणे नागरिकांना यातना देणारे ठरत आहे.

रस्त्यावर एक फुटाहून अधिक खोल खड्डे पडले आहेत, तसेच गुरुसहानीनगर ते एन-३ मार्गे कामगार चौक व हायकोर्टाकडे जाणारा रस्ता उखडला आहे. सुमारे ३०० मीटर लांबी असलेल्या या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, प्रत्येक वाहन चालकाला खड्डे वाचवून जावे लागते आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने काहीही प्रयत्न केलेले नाहीत. मागील पाच वर्षांत एन-४, एन-३, विश्रांतीनगर आणि जयभवानीनगर या तिन्ही वॉर्डांचे नगरसेवक भाजपचे होते. विश्रांतीनगरचे माजी नगरसेवक प्रमोद राठोड म्हणाले की, त्या रस्त्यासाठी अडीच कोटींची निविदा झाली आहे. काँक्रिटीकरणातून रस्ता करण्यात येईल, असा दावा त्यांनी केला.

शहर अभियंत्यांचे मत असे...शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी सांगितले, दीपाली हॉटेल ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचे काम पालिका करणार आहे. त्यापुढे होणारे काम लोकप्रतिनिधी अनुदानातून होणार आहे. आजवरच्या माहितीनुसार जयभवानीनगर ते रेल्वेस्टेशनपर्यंतच्या रस्त्यासाठी अद्याप काहीही तरतूद झालेली नाही. 

काम का थांबविले हे सांगावे पूर्व मतदारसंघाचे आ. अतुल सावे यांनी सांगितले, त्या रस्त्यासह इतर कामांसाठी मागील सरकारने पाच कोटी दिले होते. निवडणुकांमुळे निविदा आणि वर्कआॅर्डरला उशीर झाला. सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन कामही सुरू झाले; परंतु मनपाने ते काम पुढे नेलेच नाही. शासनाने अनुदान दिले आहे, याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर नगरविकास सचिवांशी बोलून चर्चा करू; अन्यथा कोर्टात दाद मागू. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी