शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला सश्रम कारावास आणि दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:22 IST

दत्तक घेतलेल्या १४ वर्षीय मुलीच्या असहाय परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार करणारा साठीतला आरोपी बाबूल खान पठाण याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि एकूण ३ हजार ५०० रुपये दंड ठोठावला. पीडित मुलीची आई भोळसर असून, तिचे वडील वारलेले आहेत. आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

औरंगाबाद : दत्तक घेतलेल्या १४ वर्षीय मुलीच्या असहाय परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार करणारा साठीतला आरोपी बाबूल खान पठाण याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि एकूण ३ हजार ५०० रुपये दंड ठोठावला.पीडित मुलीची आई भोळसर असून, तिचे वडील वारलेले आहेत. आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती.घटनेच्या वेळी इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी बाबूल खान पठाण (६०, रा. औरंगाबाद जिल्हा) व त्याच्या पत्नीने त्या मुलीला दत्तक घेतले होते. १६ डिसेंबर २०१६ रोजी बाबूल खानची पत्नी लग्नासाठी बाहेरगावी गेली होती. घरात मुलगी व बाबूल खान हे दोघेच होते. मुलगी रात्री जेवण करून झोपली असता, बाबूल खानने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुसºया दिवशीही त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यापूर्वीही त्याने तिला त्रास दिला होता. आरोपीच्या सततच्या छळाला कंटाळून मुलीने १८ डिसेंबर रोजी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल के ले होते.खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील उल्हास पवार यांनी ७ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३७६ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार ५०० रुपये दंड ठोठावला, तसेच कलम ५०६ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. सदर पीडित मुलीला न्यायालयाच्या आदेशानुसार अनाथाश्रमात ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय