औरंगाबाद : मुजोर अॅपेरिक्षाचालकांनी विविध घटनांत दोघांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे लांबविल्याच्या घटना शहरात घडल्या. प्रवीण बुरुडे (२४, रा. शिवनेरी कॉलनी) हा विद्यार्थी सोमवारी अॅपेरिक्षातून रेल्वेस्थानकाकडून आंबेडकर चौकाकडे जात होता. वसंतराव नाईक कॉलेजजवळ उभ्या असलेल्या एका रिक्षाचालकाने (एमएच २०, डीसी ३१२५) बुरुडे बसलेल्या रिक्षास हात दाखवून थांबविले. रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने बुरुडेला ‘कुठे जात आहेस,’ असे दरडावून विचारणा केली. आपण आंबेडकर चौकाकडे जात असल्याचे बुरुडे याने सांगितल्यानंतर रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बुरुडे याच्या खिशातील १,२०० रुपयेदेखील काढून घेतले. ‘पोलीस ठाण्यात तक्रार करशील तर मारून टाकूत’, अशी धमकी देऊन रिक्षाचालकाने पोबारा केला. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षाचालकांची मुजोरी; मारहाण करुन पैसे पळविले
By admin | Updated: February 18, 2016 00:08 IST