शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षांचा बाजार; ‘एसटी’सह प्रवासी, वाहन चालक बेजार

By संतोष हिरेमठ | Updated: December 5, 2024 12:39 IST

ग्राऊंड रिपोर्ट: ‘एसटी’सह रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा, प्रवासी जेरीस

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर हातगाड्या, टपऱ्या लागतात, एखादा बाजार भरतो, अगदी तशीच काहीशी अवस्था मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षांची झाली आहे. रस्त्यावर अक्षरश: रिक्षांचा बाजार भरतो आहे. बसस्थानकातून प्रवासी बाहेर पडताच ‘हर्सूल आहे का, सिडको आहे का, कुठे जायचे...’ असे म्हणत रिक्षा चालक प्रवाशांच्या मागे हात धुऊन लागतात. त्यामुळे प्रवासी बेजार होत आहेत. तर रिक्षांच्या अडथळ्यामुळे रस्त्यावरील अन्य वाहन चालक, पादचारीही हैराण होत आहेत.

मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारतीत ये-जा करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत आणि एसटी आत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी असे दोन प्रवेशद्वार आहेत. या चारही गेटला रिक्षा चालकांचा दररोज विळखाच असतो. प्रवाशांना नेण्यासाठी येणाऱ्या दुचाकी, चारचाकी चालकांना कुठे थांबण्यासाठी जागाच नाही. परिणामी, पार्किंगमध्ये अथवा भररस्त्यावरच वाहन उभे करावे लागते. अशावेळी वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते. मात्र, रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराला कोणीही आवर घालताना दिसत नाही.

शहर बसथांब्यावरही रिक्षाचमध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराला लागूनच रिक्षा थांबा आहे. अनेक रिक्षा चालक प्रामाणिकपणे रांगेत रिक्षा उभ्या करतात. परंतु रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षांची संख्या कितीतरी अधिक आहे. प्रवासी नेण्यावरून थांब्यावरील आणि रस्त्यावर उभे राहणाऱ्या रिक्षा चालकांमध्ये वादही होतात. येथील शहर बसथांब्यावरही रिक्षांच थांबतात.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रिक्षाच रिक्षामध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रिक्षाच रिक्षा दिसतात. दुभाजक ओलांडून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी आपल्याच रिक्षात बसावे, यासाठी रिक्षा चालक रस्त्याच्या मधोमध जाऊन ‘कुठे जायचे?’ अशी विचारणा करताना पाहायला मिळाले.

चौकी रिकामीचमध्यवर्ती बसस्थानकासमोर चौकी आहे. मात्र, या चौकीत कधीतरी वाहतूक पोलिस कर्मचारी दिसतात, असे रिक्षा चालकांनीच सांगितले. ‘लोकमत’ने बुधवारी दुपारी पाहणी केली, तेव्हाही चौकीत कोणी नव्हते.

एसटी आत, बाहेर नेण्याची कसरतमध्यवर्ती बसस्थानकाच्या आत आणि बाहेर पडणाऱ्या मार्गावरच रिक्षा उभ्या राहतात. त्यामुळे एसटी चालकांना बस आतमध्ये नेताना आणि बसस्थानकातून बाहेर पडताना मोठी कसरत करावी लागते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरauto rickshawऑटो रिक्षाTrafficवाहतूक कोंडी