शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर रिक्षांत गॅस किट की बॉम्ब? जप्त रिक्षाला विनातपासणीच 'ओके' प्रमाणपत्र

By संतोष हिरेमठ | Updated: November 5, 2022 18:41 IST

आरटीओत उभ्या रिक्षाला दिले प्रमाणपत्र : मोबाइल क्रमांक, फोटो, रिक्षा क्रमांक, पैसे पाठवताच गॅस किटची टाकी ‘ओके’

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : आरटीओ कार्यालयात उभ्या असलेल्या एलपीजी रिक्षाच्या गॅस किटच्या टाकीची तपासणी न करताच ती ‘ओके’ असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशाप्रकारे विनातपासणी प्रमाणपत्र घेणाऱ्या रिक्षांत गॅस किट आहे की बॉम्ब, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पेट्रोल, डिझेलचे वाढते दर आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, इंधन खर्च कमी व्हावा, यासाठी शासनाने रिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) वापरास मान्यता दिली. या वाहनांसाठी दर पाच वर्षांनी टाकीच्या क्षमतेची तपासणी करणे बंधनकारक आहे. तपासणी करून प्रमाणपत्र सादर करावे लागते, मात्र कोणत्याही तपासणीविना हे प्रमाणपत्र मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

काय आहे प्रकार ?कारवाई करून जप्त केलेल्या आरटीओ कार्यालयात उभ्या रिक्षाचा क्रमांक आणि टाकीचा फोटो मोबाइलवरून जांभाळा येथील एजन्सीला पाठविण्यात आला. अडीच हजार रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर काही वेळात संबंधित व्यक्तीने प्रमाणपत्र आणून दिले, असे रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

तपासणी का गरजेची ?‘एलपीजी’मुळे काही कालावधीनंतर टाकीची जाडी कमी होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे दर पाच वर्षांनी टाकीच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. गॅस किटची टाकी बसविली आहे, त्याठिकाणी ब्रेक वायरसारख्या इतर पार्ट्सचे अनेकदा घर्षण होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून सिलिंडरची दाब क्षमता कमी होते. अशा वेळी गॅस गळती, स्फोट झाल्यास मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होतो.

योग्य तपासणीनंतरच प्रमाणपत्र मिळावेटाकीची योग्य तपासणी करूनच प्रमाणपत्र मिळाले पाहिजे; परंतु तसे होताना दिसत नाही. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न आहे.- निसार अहेमद, अध्यक्ष, रिक्षाचालक- मालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ

कारवाई केली जाईलविनातपासणी ‘एलपीजी’ रिक्षाच्या टाकीची तपासणीचे प्रमाणपत्र देणाऱ्या एजन्सीवर कारवाई केली जाईल. याविषयी ‘पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’ला (पेसो) माहिती दिली जाईल. ज्यांनी हा प्रकार समोर आणला, त्यांनी एकप्रकारे चांगले काम केले आहे. यापूर्वीही एका एजन्सीवर कारवाई केलेली आहे.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद