शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

रस्त्यावर खिळखिळ्या, वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बसेस; अपघात झाला तर जबाबदार कोण?

By संतोष हिरेमठ | Updated: February 8, 2024 19:26 IST

नादुरुस्त, खराब बसविषयी काही तक्रार करायची असेल तर प्रवासी बसस्थानकातील स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात.

छत्रपती संभाजीनगर : नियमानुसार १५ वर्षांवरील एसटी बस भंगारात काढली जाते. १५ वर्षांवरील एकही बस रस्त्यावर धावत नसल्याचा दावा केला जातो. मात्र, खिळखिळ्या, वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बसगाड्यांमुळे प्रवासी हैराण तर होतात. मात्र, अशा बसेसला अपघात झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जातो.

जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात ५२९ बसेस आहे. यातील काही बसेस नादुरुस्तीमुळे कार्यशाळेतच असतात, तर काही बसेस नादुरुस्त अवस्थेतच धावतात. लाईट बंद आहे, गरम होऊन बस बंद पडते, प्रेशर लिक आहे, गिअर अचानक सटकतो, सीट तुटलेल्या यासह अनेक तक्रारी चालकांकडून होत असल्याची स्थिती आहे.

- मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या या स्लीपर प्लस सिटिंग बसला जागोजागी पत्र्याचे ठिगळ लावलेले पाहायला मिळाले.- बसस्थानकाबाहेर पडणारी खिळखिळी झालेली बस.

१३ बसेस भंगारातगेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १३ बसेस भंगारात काढण्यात आल्या. यात सिल्लोड आगारातील ३, कन्नड आगारातील २, सिडको बसस्थानकातील ४, मध्यवर्ती बसस्थानक, गंगापूर, पैठण, सोयगाव आगारातील प्रत्येकी एक बस भंगारात काढण्यात आली.

सध्या कोणत्या आगारात किती बसेस?आगार - बसेससिडको बसस्थानक - ८४मध्यवर्ती बसस्थानक - ११९पैठण- ६५सिल्लोड - ७०वैजापूर- ५१कन्नड- ५१गंगापूर - ५३सोयगाव- ३६

प्रवाशांनी बसेसबाबत तक्रार कोठे करायची?नादुरुस्त, खराब बसविषयी काही तक्रार करायची असेल तर प्रवासी बसस्थानकातील स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात.

१५ वर्षांवरील एकही बस नाहीजिल्ह्यात सध्या १५ वर्षांवरील एकही बस नाही. १५ वर्षांवरील बस भंगारात काढल्या जातात. सध्या असलेल्या बसेसची नियमितपणे देखभाल-दुरुस्ती केली जाते.- श्रावण सोनवणे, यंत्र अभियंता, एसटी महामंडळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात