शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

समांतर जलवाहिनीचा सुधारित प्रस्ताव महिनाभरात शासनाकडे दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:42 IST

समांतर जलवाहिनीच्या कंपनीची यापूर्वीच मनपाने हकालपट्टी केली आहे.

ठळक मुद्देनव्या जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय सातारा-देवळाईचा समावेश नव्या योजनेत करणार

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीसाठी सुधारित प्रस्ताव येत्या महिनाभरात शासनाकडे पाठविण्यात येईल. या प्रस्तावात सातारा-देवळाईचा समावेश करण्यात येणार आहे. शहराच्या आसपास २०० पेक्षा अधिक वसाहती आहेत. जिथे महापालिकेने मागील पंधरा वर्षांमध्ये जलवाहिन्याच टाकलेल्या नाहीत. त्या नो नेटवर्क एरियामध्येही जलवाहिन्या टाकण्यात याव्यात, असे प्रस्तावात नमूद केले जाणार असल्याचे आज आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले.

समांतर जलवाहिनीच्या कंपनीची यापूर्वीच मनपाने हकालपट्टी केली आहे. कंपनीने प्रकरण न्यायालयात नेऊन महापालिकेची कोंडी केली आहे. न्यायालयाबाहेर समेट घडवून आणण्यासाठी मनपाने अनेकदा प्रयत्न केले. कंपनीच्या जाचक अटींमुळे बोलणी फिसकटली. मनपा प्रशासनाने मार्चच्या पहिल्या आठवड्यातच नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. योजनेसाठी पालिकेने १०२३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. सोबतच सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी ४०० कोटी रुपयांचा प्रस्तावही पाठवला होता. मात्र, हे दोन्ही प्रस्ताव परत पाठवीत शासनाने दोन वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजनांना निधी मंजूर करता येणार नाही, असे कळविले आहे. 

समांतरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतच सातारा-देवळाईचा समावेश करून सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे पालिकेला सूचित केले आहे. बुधवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार सातारा-देवळाईचा डीपीआर केलेल्या पीएमसीकडूनच आता सुधारित डीपीआर तयार करून घेतला जात आहे. आगामी २० दिवसांत हा डीपीआर पीएमसी तयार करणार आहे. त्यानंतर तो प्रस्ताव मनपाच्या सभेसमोर ठेवून शासनाकडे पाठविला जाईल. विशेष म्हणजे या सुधारित प्रस्तावात शहराच्या ज्या भागात आजपर्यंत जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत, अशा नो नेटवर्क एरियाचाही समावेश केला जाणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. 

काही कामे स्मार्ट सिटीतूनहनुमान टेकडी, ज्युबिली पार्क, शहागंज, एन-५ या जलकुंभांवर योग्य दाबाने पाणी येत नसल्याने ते भरत नाहीत. त्यामुळे शहराला सद्य:स्थितीत पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या दोन्हीही जुन्या योजनांत सुधारणा करण्यासाठी काही आवश्यक कामे करण्यासाठी डॉ. राजेंद्र होलाणी यांनी प्रस्ताव दिला आहे. १० कोटींचा याकामी खर्च आहे. तेवढा निधी सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे हे काम आता स्मार्ट सिटीतील स्मार्ट वॉटरसाठी आरक्षित निधीतून करणार असल्याचे आयुक्त डॉ. निपुण यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकार