शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ‘महसूल’च्या बदल्या ! उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ तहसीलदारांची यादी जाहीर

By विकास राऊत | Updated: April 13, 2023 16:30 IST

मागील आठ महिन्यांपासून बदल्यांच्या प्रस्तावावर निर्णय होत नव्हता.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सुमारे डझनभर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या. तर आज १४ तहसीलदारांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांचा प्रशासकीय विभाग बदलण्यात आला आहे. 

मागील आठ महिन्यांपासून बदल्यांच्या प्रस्तावावर निर्णय होत नव्हता. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता तहसीलदारांच्या बदल्या झाल्या. तर ३१ मे पर्यंत महसूलमधील पूर्ण बदल्या होतील, असे बोलले जात आहे. दरम्यान, मराठवाड्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पदस्थापना देण्यात आली आहे, तर वक्फ जमिनीच्या प्रकरणात निलंबित उपजिल्हाधिकाऱ्यांस पदस्थापना देत विदर्भात बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोकण विभागातील ५० उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. मराठवाड्यातील बदली झालेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जागेवर अद्याप कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. यामध्ये वैजापूर, कन्नड उपविभागीय अधिकारी, राजशिष्टाचार उपजिल्हाधिकाऱ्यांसह हिंगोली, लातूर, बीड, जालना, नांदेड येथील पदांवर अजून कुणालाही नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत आणखी काही बदल्यांची ऑर्डर होईल, अशी चर्चा आहे. 

मराठवाड्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये चंद्रकांत सूर्यवंशी यांची रत्नागिरीत, जीवन देसाई रायगड, मच्छिंद्र सुकटे सिंधुदुर्ग, अंजली पवार कोकण भवन, नामदेव टीळेकर माळशिरस, शर्मिला भोसले नाशिक, माणिक आहेर शिर्डी, सुधीर पाटील अहमदनगर, जनार्दन विधाते छत्रपती संभाजीनगर, संगीता चव्हाण नांदेड, शेषराव सावरगावकर महसूल प्रबाेधिनीत बदली झाली आहे.

फौजदारीच्या अधीन राहून पदस्थापनाबीड जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना प्रकाश आघाव पाटील यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनींमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला असून, विभागीय चौकशी सुरू आहे. चौकशीच्या व फौजदारी प्रकरणाच्या अधीन राहून त्यांना गोंदिया जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील १४ तहसीलदारांच्या बदल्याविभागातील १४ तहसीलदारांच्या बदल्या शासनाने केल्या असून दोन जणांना प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्यामध्ये महेश परांडेकर यांची लातूरहून धर्माबादला, दत्तात्रय शिंदे यांची लातूरला, विद्याचरण कवडकर यांची कन्नड येथे, संजय वारकड यांची नांदेडला, अश्विनी डमरे यांची विभागीय आयुक्त कार्यालयात, सुवर्णा पवार यांची आयुक्तालयात, नरेंद्र कुलकर्णी यांची बीड येथे, श्रीकांत भुजबळ यांची महसूल प्रबोधिनीत, काशिनाथ पाटील यांची देवणी तालुक्यात, शिवानंद बिडवे यांची धाराशिव येथे, तेजस्विनी जाधव यांची परभणीत बदली झाली तर प्रणाली तायडे यांची राज्य हक्क सेवा आयोगात आणि योगिता कोल्हे यांची रस्ते विकास महामंडळमध्ये तसेच स्वप्नील पवार यांची लातूर येथून कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद