शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील महसूल विभाग ‘प्रभारीं’च्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 17:54 IST

मराठवाड्यातील महसूलचा कारभार सध्या ‘प्रभारीं’च्या खांद्यावर आहे. २८ उपजिल्हाधिकारी आणि ९ तहसीलदारांच्या रिक्त पदांवर अधिकारी नेमण्यात शासनाने दिरंगाई केल्यामुळे सगळा कारभार ढेपाळला आहे.

ठळक मुद्देमध्यंतरी शासनाने काही उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या

- विकास राऊत 

मराठवाडा : मराठवाड्यातील महसूलचा कारभार सध्या ‘प्रभारीं’च्या खांद्यावर आहे. २८ उपजिल्हाधिकारी आणि ९ तहसीलदारांच्या रिक्त पदांवर अधिकारी नेमण्यात शासनाने दिरंगाई केल्यामुळे सगळा कारभार ढेपाळला आहे. बीडमध्ये ६ जागा, उस्मानाबाद ५, परभणी ४, औरंगाबाद व नांदेड, हिंगोलीत प्रत्येकी ३ जागा तर जालना, लातूर प्रत्येकी २ जागा रिक्त आहेत. परिणामी सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात परवड होत आहे. किरकोळ कामांसाठी नागरिकांना महसूल प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. 

मध्यंतरी शासनाने काही उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. परंतु ते अधिकारी विद्यमान जागेवरून कार्यमुक्तच केले नाहीत. त्यामुळे जागा तशाच रिक्त राहिल्या. महत्त्वाचे म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, भूसंपादन, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुनर्वसन, रोहयो, निवडणूक अधिकारी या पदावरील जागा रिक्त आहेत. या सर्व विभागांच्या जबाबदाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांवर टाकल्यामुळे ते विभागात येतच नाहीत. त्यामुळे विभागात शेकडो संचिकांचा ढीग साचला आहे. परिणामी सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. 

महसूल  उपायुक्त नाहीडिसेंबर २०१७ मध्ये प्रल्हाद कचरे हे विभागीय महसूल उपायुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर शासनाने महसूल उपायुक्त या पदावर अधिकाऱ्याची नेमणूकच केली नाही. चार महिन्यांपासून महसूल उपायुक्त हे पद रिक्त आहे. या पदावर शासनाने अधिकारी नियुक्त न केल्यामुळे अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात हे पद रिक्त राहिले आहे. 

विभागातील रिक्त जागा- औरंगाबाद : निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी. - जालना : विशेष भूसंपादन अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी.- परभणी : जिल्हा पुरवठा अधिकारी, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारी.- हिंगोली : विशेष भूसंपादन अधिकारी, उपविभागीय अधिकारी.- नांदेड : भूसंपादन उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारी.- बीड : विशेष भूसंपादन अधिकारी (एकूण तीन जागा), उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, निवडणूक, पुरवठा अधिकारी.- लातूर : उपजिल्हाधिकारी रोहयो, विशेष भूसंपादन अधिकारी.- उस्मानाबाद : उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन, रोहयो, सामान्य प्रशासन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारTransferबदलीMarathwadaमराठवाडा