शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नापासांना दिलेल्या पदव्या घेतल्या परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 05:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (बीसीए) अभ्यासक्रमाला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्या अखेर परत घेतल्या आहेत, तशी माहिती स्वत: कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (बीसीए) अभ्यासक्रमाला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्या अखेर परत घेतल्या आहेत, तशी माहिती स्वत: कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिली.‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या नापास विद्यार्थ्यांच्या पदव्या वाटप प्रकरणावर कुलगुरू चोपडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘लोकमत’कडून माहिती कळल्यानंतर पाच मिनिटांमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. फक्त बीसीएच्या पदव्यांमध्येच ही गडबड झाल्याचे समोर आले. महाविद्यालयात पाठविलेल्या सदोष पदव्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एका दिवसात जमा केल्या. आता कुणाकडेच सदोष पदवी प्रमाणपत्र नाही, तसेच विद्यापीठ अध्यादेश १०१ नुसार कोणतेही सदोष प्रमाणपत्र दुरुस्त करण्याचा, त्यात बदल करण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे. चुकून एखाद्या विद्यार्थ्याला सदोष पदवी प्रमाणपत्र दिल्याचे यापुढेही लक्षात आलेच, तर ते रद्द करण्यात येईल, असेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीत व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे आणि अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांचा समावेश आहे. ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करील.>सहा जणांना कारणे दाखवाडॉ. दिगंबर नेटके, उपकुलसचिव हेमलता ठाकरे, कक्ष अधिकारी पोपट निकम, भगवान फड, वरिष्ठ सहायक राजू गायकवाड आणि विनोद जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी सांगितले.>नैतिक जबाबदारी स्वीकारून माफी मागतोविद्यापीठाने पहिल्यांदाच पदवी प्रमाणपत्राच्या छपाईचे आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला. हा आदेश परीक्षा विभागाला ६ मे रोजी मिळाला. दीक्षान्त सोहळा १५ मे रोजी होता. संबंधित कंपनीला पदव्या छापण्याची दिलेली वर्कआॅर्डर आणि दीक्षान्त सोहळ्यात अवघा सात दिवसांचा कालावधी होता. यामुळे कंपनीकडे पाठविलेल्या २६४ अभ्यासक्रमांपैकी एका बीसीएच्या डेटात तांत्रिक चूक झाली. यामुळे विद्यापीठाची जी बदनामी झाली, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मराठवाड्यातील जनतेची माफी मागतो.- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा संचालक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद