शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त फौजदाराने ‘ऐनी डेस्क’ डाऊनलोड केले अन बँक खाते झाले रिकामे, १० लाख ऑनलाईन लांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 13:42 IST

cyber crime एसबीआय बँकेचे ऑनलाइन ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी गुगलवरून मिळालेल्या क्रमांकावर केला संपर्क

पैठण (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यातील चणकवाडी येथील सेवानिवृत्त फौजदाराच्या खात्यातून तब्बल १०.२४ लाख रुपयांची रक्कम सायबर भामट्याने लांबवल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली. ‘ऐनी डेस्क’ नावाचे ॲप डाऊनलोड करताच भामट्याने फौजदाराचे खातेच रिकामे केले.सायबर गुन्हेगार (cyber crime) विविध फंडे वापरून ऑनलाइन गंडा घालत आहेत.

चणकवाडी येथील सेवानिवृत्त फौजदार तुकाराम मोहिते(६३) यांचे एसबीआय बँकेत खाते असून, गुरुवारी(दि.१३) सकाळी ८.४५ वाजता एसबीआय बँकेचे ऑनलाइन ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी मोहिते हे मोबाइलमध्ये सर्चिंग करत होते. त्यांना गुगलवर एसबीआय बँकेच्या हेल्पलाइन नंबर मिळाला. त्या क्रमांकावर त्यांनी फोन केला. समोरून मी एसबीआय बँकेचा अधिकारी बोलत आहे, असे सांगितले गेले.

बँकेचे ॲप डाऊनलोड करायचे असेल तर त्यापूर्वी ‘ऐनी डेस्क’ नावाचे ॲप डाऊनलोड करा, असे मोहिते यांना सांगण्यात आले. त्यामुळे मोहिते यांनी ऐनी डेस्क ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर सदर व्यक्तीने ॲप आयडी कोड विचारला. बँकेचा अधिकारीच बोलत असल्याने मोहिते यांनी कोडही सांगितला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातील तब्बल १० लाख २४ हजारांची रक्कम सायबर भामट्याने काढून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुकाराम मोहिते यांनी पैठण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात सायबर गुन्हेगारावर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे करीत आहेत.

दोन लाख ४५ हजार वाचलेसायबर भामटे तुकाराम मोहिते यांच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेत होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा दाखल करण्याअगोदर पोलीस निरीक्षक किशोर पवार व उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांनी याबाबत बँकेला अवगत करून खाते सील केले. त्यामुळे मोहिते यांच्या खात्यातील दोन लाख ४५ हजार रुपयांची रक्कम वाचली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी