शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

झालेल्या कामांचाच पुन्हा प्रस्ताव

By admin | Updated: June 13, 2017 00:41 IST

नांदेड: शहरात रस्ता अनुदान व आमदार निधीतून झालेल्या रस्त्यांची कामे पुन्हा नगरोत्थान योजनेतून केल्याचे दर्शविण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरात रस्ता अनुदान व आमदार निधीतून झालेल्या रस्त्यांची कामे पुन्हा नगरोत्थान योजनेतून केल्याचे दर्शविण्यात येत आहेत. यातून जनतेचा कोट्यवधी रुपये हडप केले जात असल्याचा आरोप मनपाचे विरोधी पक्षनेता प्रमोद खेडकर यांनी पत्रपरिषदेत केला़जेएनयुआरएम, बीएसयुपी, नगरोत्थान योजनेतील कामासाठी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन, सदर योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करणे. झालेल्या कामांच्या देखभालीसाठी तसेच अमृत योजनेच्या लोकवाट्याची रक्कम भरण्यासाठी महापालिकेच्या दीडशे कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. हुडकोने हे कर्ज देण्यास संमतीही दिली आहे. दुसरीकडे नगरोत्थान योजनेतून १६ कोटी रुपयांच्या कामांना सत्ताधाऱ्यांनी २७ फेब्रुवारी २०१७ च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिल्याचा ठराव परस्पर आयत्यावेळी मंजूर केला आहे. कामे झालेली असतानाही ती कामे प्रस्तावित करुन निधी हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. शिवाजीनगर, शोभानगर, पौर्णिमानगर याच भागात ही कामे घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे दीडशे कोटी रुपयांच्या कर्जातून कामे घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. २७ फेब्रुवारी रोजीच्या मूळ विषयपत्रिका व पुरवणी विषयपत्रिकेतही १६ कोटींच्या कामावर कोणतीच चर्चा झाली नाही. त्या सभेनंतर दोन सभा झाल्या. त्या सभेतही कोणताही प्रस्ताव नव्हता. परंतु ५ जून रोजी महापौरांनी २७ फेब्रुवारी या मागच्या तारखेतील सर्वसाधारण सभेत १६ कोटींची कामे मंजूर केल्याचा ठराव प्रशासनाकडे पाठवून सभागृह व जनतेची फसवणूक केल्याचा आरोप खेडकर यांनी केला. मागच्या दोन वेगवेगळ्या सभेत रस्ते अनुदान आणि दलित वस्ती सुधार योजनेत महापौरांच्या प्रभागात मंजूर केलेली काही कामेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.